जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळांच्या पुनः बांधणी व दुरुस्तीसाठी निधी द्या, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन

--- 
(बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरावस्था असुन प्राथमिक विभागाच्या कसलीच ईमारत नसलेल्या १०३ शाळांच्या इमारतीसाठी आणि धोकादायक वर्गखोल्यांसाठी मिळुन एकुण ९४ कोटींच्या निधींची आवश्यकता असुन निधीची तरतूद करण्यात यावी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन दिले.

प्राथमिक शाळांसाठी ९४.१० कोटी निधीची आवश्यकता
---
शिक्षण विभाग अंतर्गत इमारत विरहीत १०३ शाळा असुन प्रत्येक शाळेस २ वर्गखोल्या अशा एकुण २०६ वर्गखोल्यांसाठी प्रतिवर्ग खोली १० लक्ष रुपये प्रमाणे एकुण २०.६० कोटींची आवश्यक आहे.
तर धोकादायक वर्गखोल्या ६०० आहेत.त्यासाठी प्रति वर्गखोली १० लक्ष प्रमाणे ६० कोटी व पटसंख्या वाढल्याने आवश्यक असलेल्या १३५ वर्गखोल्यांसाठी प्रतिवर्ग खोली १० लक्ष प्रमाणे १३.५० कोटी निधी असा एकुण शिक्षण विभागास ९४.१० कोटी निधींची आवश्यकता असुन तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी