अधीक्षक अभियंता स्वामी यांच्या ढिसाळ नियोजना अभावी विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा फज्जा
परळी प्रतिनिधी. सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई चे अध्यक्ष अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या ढिसाळ नियोजना अभावी शासकीय विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा अक्षरशः फज्जा उडाला. पालकमंत्री तथा कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या विश्रामगृहाचे उद्घाटन केले.
याविषयी अधिक माहिती अशी की, परळी शहरातील शिवाजी चौका जवळ करोडो रुपये खर्च करून शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही कारणास्तव नामदार धनंजय मुंडे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या ऐवजी बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ यांच्या हस्ते आज विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, स्वतः अधिक्षक अभियंता गौरीशंकर स्वामी व इतर अभियंता उपस्थित होते. तर समोर कार्यक्रमासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.दहा वीस लोक सोडले तर कार्यक्रमाकडे कार्यकर्ते तसेच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही ही पाठ फिरवल्याचे दिसले.
अधीक्षक अभियंता स्वामी यांनी ठरवले असते तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सभागृह भरून गेले असते. तसेच शहरातील इतर नागरिक यांचीही उपस्थिती राहिली असती. परंतु त्यांच्या नियोजन शून्य व ढिसाळ आयोजनाचा फटका या उद्घाटन समारंभाला बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ अध्यक्ष अभियंता स्वामी यांच्यावर नाराज झाल्याचे समजते.
उद्घाटन समारंभासाठी येणाऱ्या मान्यवर तसेच पाहुण्यांसाठी विश्रामगृहातच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लोकांचीच उपस्थिती नसल्याने शेवटी तेथील कर्मचाऱ्यांनाच जेवणावर ताव मारावा लागला.
Comments
Post a Comment