बोरीसावरगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - रोहन गलांडे पाटील

बोरीसावरगाव येथे जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - रोहन गलांडे पाटील

केज तालुक्यातील सकल मराठा समाजाने उपस्थित रहावे
केज प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांना हात जोडून विनंती करण्यात येते की आपण मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्मथनार्थ बोरीसावरगाव येथे आयोजित केलेल्या मराठा सभेला केज तालुक्यातुन लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे तसेच आपल्या मराठा सभेला गालबोट लागू नये यांची काळजी प्रेत्येकाने घ्यावी. रोहन गलांडे यांनी असे म्हटले आहे की ही आपन सर्वांनी राजकीय मतभेद विसरून या सभेसाठी उपस्थित रहावे तसेच तुम्ही राजकीय सभा असेल किंवा एखाद्या नेत्याची सभा असेल तर उपाशी रहात पन सभेला हजर असतात.परंतु ही मराठा समाजाची आपल्या आरक्षणासाठी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यसाठी आपल्या न्याय हक्कासाठी ही मराठ्यांची सभा आहे तरी बोरीसावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले असून त्या अनुषंगाने त्या निमित्त बोरी सावरगाव ते बनसारोळा रस्त्यालगत 100 एकर जागेचे नियोजन करण्यात आले त्या जागेचे शेतातील उभे पीक नष्ट करून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्यानिमित्त त्या शेतकरी बांधवांचे उपस्थित सकल मराठा समाज बांधवाकडुन कौतुक होत आहे. तरी केज तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठायोद्धे रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी