कडुदास कांबळे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित
नाशिक ( प्रतिनिधी ) दि. 30 नोव्हेंबर 23
कडूदास कांबळे यांना 29 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4:00 वाजता महाकवी कालीदास कलामंदिर नाशिक येथे आदिवासी विभागाच्या वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. डॉ. विजयकुमार गावीत साहेब यांच्या हस्ते तसेच आयुक्त मा. नयना गुंडे (भा.प्र.से.) आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक व अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम 25001रुपये, सन्मान पत्र, महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासासाठी सवलत कार्ड देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या प्रशांत बोकडे, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) बी. ए. कदम , आदिवासी विकास निरीक्षक पि. एल. कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यामधून एकमेव आदिवासी सेवक पुरस्कारार्थी म्हणून कडूदास कांबळे यांची निवड करण्यात आली.
कडुदास कांबळे गेल्या 30 वर्षापासून आदिवासी समाजासाठी कार्य करीत आहेत. आदिवासी मुलां- मुलींचे शिक्षण, आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचार, आदिवासींच्या वन जमिनीचे हक्क, आदिवासींचे गायरान जमिनीचे हक्क, आदिवासींच्या बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनी मिळवून देणे , आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचार यासारख्या प्रश्नावर संघर्ष करून मराठवाड्यातील आदिवासी विशेषतः भिल्ल, पारधी या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आदिवासींची संघटनात्मक बांधणी करून आदिवासींचे जनजागृती परिवर्तन मेळावे घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, रेशन कार्ड, मिळवून देण्यासाठी महसुली अधिकाऱ्यासोबत पाठपुरावा करून कॅम्प घेऊन आदिवासी समाज बांधवांना दिलेले आहेत. आदिवासींच्या हक्कासाठी महाराष्ट्र पातळीवर जनहक्क यात्रेचे आयोजन करून महाराष्ट्रातील आदिवासी समाज जोडण्याचे काम केलेले आहे आणि करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत "आदिवासी सेवक" पुरस्काराने सन्मानित झाल्याने कडूदास कांबळे यांचे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ज्यामध्ये फिल्म अभिनेत्री नभांगण फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री देशपांडे, ॲक्शन एड संस्थेचे दिल्ली येथील तनवीर काझी सर, नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र संस्थेच्या अध्यक्ष मनीषाताई घुले, महादेवभाऊ जोगदंड, कोरो इंडिया संस्थेच्या लक्ष्मीताई वाघमारे, जाणता राजा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश देशमुख, सचिव ॲड. सुभाष निकम, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, किरण ठाकरे सर, ट्रायबल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव जाधव, मूलनिवासी संघाच्या प्रदेशाध्यक्ष पल्लवीताई खैरे, मानवी हक्क अभियान संघटनेचे राजेश घोडे, राधिका चिंचोलीकर, मच्छिंद्र गवाले, पप्पू शेळके, भारत बळवंते, भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरुण जाधव, BS4संघटनेचे पदाधिकारी, रिपाई खरात गटाचे जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड, शाहू महाराज रिक्षा युनियनचे अध्यक्ष सतीश प्रधान, भोई समाजाच्या प्रदेश सचिव शकुंतला घुंगासे, आकांक्षा घाटूळ, क्रांती असंघटित महिला कामगार युनियनच्या अध्यक्षा शाहीन पठाण, मंगलताई पवार, कविताताई डोंगरे, मनीषाताई शरणांगत, रोहिणी राऊत, यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, समाज बांधवांकडून महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment