सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ.युमना शिवाजी सोनवणे यांनी स्वीकारला पदभार

उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- गोविंद सोनवणे अंबाजोगाई (प्रतिनिधी ) :- अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तसेच उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे व पॅनल प्रमुख गोविंद सोनवणे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणूक 2022 संपन्न झाली आणि उपसरपंच यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची एक मताने निवड करण्यात आली. सोमनवाडी ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्...