आयेशा शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा,आश्रय सेवा केंद्राचा उद्घाटन व किन्नर कमिटी सन्मान सोहळा
बीड प्रतिनिधी / बीड शहरातील सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत समाजसेवे बरोबरच किन्नर कमिटीच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या सामाजिक, तसेच किन्नर कमिटीचे प्रश्न मार्गी लावून न्याय मिळवून देणाऱ्या व मराठवाड्यातील पहिला किन्नर विवाह लावून देणाऱ्या पत्रकार तथा समाजसेविका आयेशा रफिक शेख यांचा एक जानेवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार राहणार आहे त्यामध्ये संतोष वाळके,सुरेखा धसे, डॉ.सुरेश साबळे, शैलेश शेजवळ, मीना तुपे, आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास बीड शहरातील किन्नर कमिटीच्या महिलांना तिरंगा साडी वाटप व एका किन्नर स्वतःच्या पायावर उभा करून देण्यासाठी स्टॉल टाकून देऊन हा अनोखा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.अभिष्टचिंतन सोहळा सम्राट चौक येथील दैनिक समर्थ राजयोग व दैनिक सूर्योदय येथील कार्यालयात संपन्न होणार आहे.
Comments
Post a Comment