देवठाण येथे नुकत्याच सैन्य भरती झालेल्या जवानांचा सत्कार समारंभ संपन्न
या वेळी संकेत जानराव व सर्व जवानांचा सत्कार भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब डमाळे पाटील, कॅप्टन कोठारी,आसाराम महाराज,जाधव महाराज, प्रा. दत्तात्रय वैद्य, बबनराव साळवे, विजय खैरनार, श्याम बावचे, शेळके साहेब, विजय जानराव, अरुण देवरे, नाना शेळके, वरे साहेब व अन्य मानवांचे हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन सरपंच नामदेवराव जानराव यांनी केले.
 प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब डमाळे, कॅप्टन कोठारी सर यांनी देव-देश- आणि धर्माचे रक्षण जवानांच्या हाती असून हिंदुस्तानी जवान शूर पराक्रमी आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे व त्यांच्या कार्ययाळे मुळे सैन्यांमध्ये आता नवनवीन तंत्रज्ञानाचे शस्त्र आहेत.शत्रू देश हिंदुस्तान ला घाबरतात. व जवानही सच्चा दिलाने देशाचे रक्षण करतात. या जवानांना सर्वांचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.व अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
  
Comments
Post a Comment