बागलाण अकॅडमी सटाणा येथे नोबल पब्लिकेशनचे संचालक के के भुतेकर यांची सदिच्छा भेट
सटाणा येथिल पोलिस सैनिक भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र बागलाण अकॅडमीत नोबल पब्लिकेशनचे संचालक के के भुतेकर सर यांनी नुकतीच भेट दिली.
भुतेकर सर हे पोलिस भरतीचे मास्टर मार्गदर्शक आहेत, त्यांच्या पुस्तकांचे महाराष्ट्रभर वितरण होत असते. या पुस्तकांमध्ये गेल्या तीन वर्षाच्या भरतीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.
काळानुसार बदलत असणारे सदोष चुकीचे संदिग्ध प्रश्न सुयोग्य बदलासह सुधारित करून सामाविष्ट केलेले आहेत.हे त्यांचे पॅटर्न गणित, बुद्धीमत्ता जनरल नॉलेज यांच्या स्पष्टीकरणासह दिलेले आहे.पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तके फार फायद्याचे ठरलेले आहेत.
यावेळी भुतेकर सर व त्याच्या सोबत उदय वाळकुळे व टीमने नोबल पब्लिकेशनच्या पुस्तकांचा संच बागलाण अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांना भेट दिला.
यावेळी अकॅडमीचे शारिरीक प्रशिक्षक रमेश कुमार व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment