हिवाळी अधिवेशन नागपूर विधान भवनावर रोजंदारी मजूर सेनेचा आक्रोश मोर्चा - भाई गौतम आगळे


परळी (प्रतिनिधी ) रोजंदारी मजदुर सेनेचेच्या वतीने मंगळवार दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता इंदूर मैदान,पासून सुरू होऊन एल.आय. सी. मार्ग नागपूर विधान भवनावर कंत्राटी सफाई कामगारा सहित इतर कामगारांना नियमित करावे. या प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्याकरिता आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची, माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिली आहे. सफाई कामगार हा आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवतात. यांना किमान वेतन व अस्तित्वातील कामगार कायद्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात,कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा नंबर मिळावा, लाड पागे समिती यांना लागू करावी. बीड जिल्ह्या सहित सर्व राज्यातील कंत्राटी कामगारांना नियमित करेपर्यंत समान काम समान वेतन देण्यात यावे. नवीन मालक-धार्जींनी असलेले कामगार कायदे रद्द करावे. इत्यादी वरील मागण्या रोजंदारी मजूर सेना केंद्रीय अध्यक्ष चैनदास भालादरे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांचा आक्रोश मोर्चा निघणार असून या मोर्चात जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांनी सामील होऊन स्वतःचे हक्क आणि अधिकार मिळवून घ्यावे, असे आवाहन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड,बीड जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे, उपाध्यक्ष आशा कांबळे,कविता जोगदंड गंगुबाई तायडे, जिल्हा महासचिव पंचशिला क्षिनगारे, सोणूबाई आचार्य, ज्योती सिरसाठ इत्यादींनी केले आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी