वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातून कर्ज घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अर्ज करावेत - राहुल नागरगोजे
पाटोदा (गणेश शेवाळे)वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या योजने अंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज शासनाकडून देण्यात येते असून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत या योजने अंतर्गत विविध ३७ प्रकारच्या व्यवसायासाठी २५०००/- ते १,००,००० पर्यंत कर्ज देण्यात येते.या योजनेचे मूळ उद्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करणे आहे. या कर्ज योजनेसाठी अर्ज करायचे असल्यास
१. अर्जदार विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गातील असावा.२. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.३. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.४. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.५. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
६. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.
७. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल सादर करावा.
८. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सर्वप्रथम या संकेतस्थळाला भेट द्या.त्यानंतर वेबसाइटच्या वरील बाजूस नोंदणी ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता.नोंदणी करताना तुम्हाला तुमची योग्य माहिती भरून नोंदणी करायची आहे.त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती अपलोड करून तुम्ही अर्ज सबमिट करावा असे आवाहन येवलवाडी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राहुल नागरगोजे यांनी केले आहे
Comments
Post a Comment