उजनी येथील मयत फरीद शेख यांच्या कुटुंबीयांना ॲड. माधव जाधव यांनी दिला आधार
उजनी येथील मयत फरीद शेख यांच्या कुटुंबीयांना ॲड. माधव जाधव यांनी दिला आधार
तिने लहान मुलींच्या नावाने एफडी करून शिक्षणाची घेतली जबाबदारी
परळी विधानसभा मतदारसंघातील उजनी ता.अंबाजोगाई येथील शेख फरीद शेख मन्ना वय वर्ष 32 यांचे नुकतेच दि.२०/१२/२०२२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .मयत फरीद शेख यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी आणि लहान तीन मुली उघड्यावर पडले. फरीद ( शोकत ) मन्ना शेख यांच्या पश्चात पत्नी अन्वर फरीद शेख ,तीन मुली 1) परवीन फरीद शेख 2) सुमय्या फरीद शेख 3) आफरिन फरीद शेख ,मोठी मुलगी एयत्ता 5 वी दुसरी मुलगी इयत्ता 4 थी सर्वात लहान मुलगी केवळ 40 दिवसाची आहे . कुटुंबाचा मुख्य आधार हा काळाने हिरावून घेतला.मयत फरीद शेख हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदय निर्वाह कसा बसा भागवत होते.त्यांच्या कुटुंबाला इतर उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही.कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे त्यांची पत्नी व लहान तीनही मुली उघड्या पडल्या.ही बातमी मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तसा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव यांना समजल्यानंतर *ॲड.माधव जाधव यांनी उजनी येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले केले .तसेच तीनही मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे पंधरा हजार रुपयेचा धनादेश देऊन तीनही मुलीच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयाची एफडी करणे साठी आर्थिक मदत केली.तसेच तीनही लहान मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ॲड.माधव जाधव यांनी घेतली.शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन ॲड.माधव जाधव यांनी यावेळी दिले .यावेळी ॲड.माधव जाधव यांचे सोबत उजनी येथील माजी सरपंच भारत गायकवाड, कैलास गायकवाड, दिनकर कवडे व इतर शेख कुटुंब उपस्थित होते .
Comments
Post a Comment