बारामती मध्ये मोहसिन पठाण सोशल फाउंडेशन वतीने मोफत साडी वाटप कार्यक्रम
बारामती प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश सेक्रेटरी मोहसिन पठाण यांच्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती मधील सूर्यनगरी परिसरातील गरजू महिलांना मोफत साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात परिसरातील सफाई कामगार महिला त्याचबरोबर इतर गरजू गरजू महिलांना देखील मोफत साडी वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री संभाजी नाना होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष जय दादा पाटील. इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसराती सार्वत्रिकल महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मोहसीन पठाण यांनी केलेल्या या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment