पालखीमार्ग पंढरपुर हायवेचे उर्वरीत काम तात्काळ चालु करा व पाटोद्यातून जात असलेल्या दोन्ही मार्गावर जागोजागी ब्रेकर बसवा नसता आंदोलन करु ऑल इंडिया पँथरसेनेचा इशारा
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहरातून जात असलेला पैठण पंढरपूर पालखीमार्गाचे काम बंद पडले असल्यामुळे साठे चौक ते भिमनगर पर्यंतचा रस्ता अत्यत खराब झालेला आहे त्यामुळे या हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे या रोडवरून वयोवृध्द, महिला विद्यार्थी यांना चालताना फार तारेवरची कसरत करावी लागत आहे या रोड लागत मागसवर्गीय मुला-मुलीचे वस्तीगृह, व शाळा आहेत सदरचा रस्ता हा गुतेदार यांनी जागोजागी खोदून ठेवलेला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या गंभीर बाबीची दाखल घेण्यात यावी.तसेच पाटोदा शहरातील दोन्ही हायवेवर ब्रेकर बसविण्यात यावे कारण या रोडवर वहाने फार वेगाने धावत असल्यामुळे अपघात होत आहेत करीता रोडवर ब्रेकर बसविण्यात यावे जेणे करुन वहाने सावकाश चालतील व काही अनुचित प्रकार घडणार नाही या दोन्ही मागण्या तात्काळ सोडविण्यात यावेत नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटोदा ऑल इंडिया पँथर सेनेचा वतीने तहसील येथे निवेदन देऊन देण्यात आला आहे तहसीलदार यांना निवेदन देताना ऑल इंडिया पँथर सेनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सुरज जावळे, तालुका उपाध्यक्ष आमंत जावळे,यांच्या सह ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment