शिक्षण हा सर्वच प्रश्नांवरचा उपाय - दीपक कदम



बीड(प्रतिनिधी):- शिक्षण हा सर्वच प्रश्नांवरचा उपाय आहे असे प्रतिपादन आंबेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम यांनी केले ते आंबेडकरवादी मिशन द्वारा आयोजित राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान अंतर्गत संविधान निष्ट प्रशासक निर्मितीची राष्ट्रीय चळवळ या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. 26 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,बीड येथे सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रदीप गाडे,प्रमुख अतिथी म्हणून बीड तहसीलदार सुहास हजारे, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, बाबासाहेब उजगरे, प्रवीण गायकवाड, संदीप उपरे,भानुदास जाधव,अंकुश निर्मळ,राजेश तांगडे,अँड.चंद्रवर्धन जाधव यांची उपस्थिती होती. 
पुढे बोलताना दीपक कदम म्हणाले की ,व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. जगा मधला अंधकार आणि अज्ञान नष्ट करण्यासाठी माणसाला शिक्षण घेणं, शिक्षित करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.भारताला जर विश्वगुरू व्हायचं असेल तर भारतामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. 27% शिक्षित समाजाच्या पाठबळावर आपण विश्वगुरू होऊ शकत नाहीत त्यासाठी आपल्याला साक्षरतेचा दर वाढवावा लागेल असे मत व्यक्त करत त्यांनी विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपला साक्षरतेचा दर खूप कमी असल्याची खंत व्यक्त केली.ही एक चिंतनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या सर्वच गोष्टीवरचा उपाय म्हणजे तरुण पिढी बेस्ट ब्रेन होऊन बाहेर पडणे हा असून सुशिक्षित समाज एक विकसित राष्ट्र घडवू शकतो आणि त्या माध्यमातूनच आपण विश्वगुरू बनवू शकतो असा आत्मविश्वास उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. जगाला ज्ञान देण्याची ज्ञान केंद्रे आपल्या देशामध्ये होती त्यामध्ये तक्षशिला,विक्रमशीला,नालंदा ही विद्यापीठे जगाला ज्ञानदान देण्याचे कार्य करत होती. मात्र या ज्ञानदान देणाऱ्या केंद्रावर परकीय व स्वकीय आक्रमणे झाली आणि ही ज्ञान केंद्रे नष्ट झाली. पुन्हा आपल्याला ही ज्ञान केंद्रे स्वबळावर उभा करावी लागतील तरच आपण विश्वगुरू बनू शकतो. अन्यथा विश्वगुरू बनने एक स्वप्न आहे असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी अध्यक्षीय समारोपा मध्ये बोलतांना आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून जे काम समाजापुढे उभे राहिलेला आहे. हे काम अधिक विस्तृत होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे वडील रोडे गुरुजी यांच्या एका महिन्याची पेन्शन 25000/- ही राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानास मदत म्हणून सुपूर्द केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय सावते यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. विक्रम धनवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. आत्माराम झिंजूर्डे यांनी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी