जिल्हापरिषद शाळा मुले शेवगांव च्या कथित संरक्षक भिंतपाडुन कोट्यवधींचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बेकायदेशीर उभारन्याच्या कामाला शासनाच्या विविध कार्यलयात घेतली हरकत

जिल्हापरिषद शाळा मुले शेवगांव च्या कथित संरक्षक भिंतपाडुन कोट्यवधींचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बेकायदेशीर उभारन्याच्या कामाला शासनाच्या विविध कार्यलयात घेतली हरकत

{ अविनाश देशमुख शेवगांव }  

गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत असलेल्या आणि वादग्रस्त प्रस्तावित बांधकामास जिल्हापरिषद शाळा मुले च्या शालेय व्यवस्थापन समितीने शासनाच्या विविध कार्यालयात हरकती घेऊन तूर्तास अवैध पाडकामास मंनाई करावी अशी विनंती तहसीलदार शेवगांव नगरपरिषद शेवगांव पंचायत समिती शेवगांव आणि जिल्हापरिषद अहमदनगर आणि शेवगांव पोलीस यांच्याकडे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या मार्फत करण्यात आले आहे*यां जी. प. प्राथमिक शाळेला सुमारे 100 वर्षांचा इतिहास आहे कागत पत्र सुमारे एक एकर जागेचे पण जवळ जवळ दहा गुंठे जागेत अनेक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून ताबा केला आहे अनेक जुन्या पिढीतील नागरिकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे शाळेच्या पुर्व डीशेंला पाच फुट रुंद व मुख्य बाजारपेठ ते मागे मोची गल्ली अशी सार्वजनिक वापरासाठी बोळ होती कालांतराने कापड व्यापारी बालचंद गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने त्या रस्त्याला गेट लाऊन घेतले आणि ताब्यात घेतले ती जागा नेमकी कोणाची? असाही प्रश्न यां भागातील जुने नागरिक विचारू लागले आहेत



शेवगांव शहरातील अशा मुख्यबाजार पेठेतील पाच ते दहा फुट रुंद बोल्या कालांतराने धनदांडग्या लोकांनी बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतल्या आहेत हे अतिक्रमण काढणार कोण ?कोणाकडे यां बाबत जुनी कागतपत्रे उतारे असल्यास शासना कडे सादर करावीत असे आवाहन "मी शेवगांवकर" संघटना करत आहे 

क्रमशः
 
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी