आष्टीतील मनसे कार्यकर्त्यांकडूननागपूरमध्ये जागरण गोंधळ आंदोलन

आष्टीतील मनसे कार्यकर्त्यांकडून
नागपूरमध्ये जागरण गोंधळ आंदोलन

शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य पुन्हा सुरू करण्याची मागणी
आष्टी - शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे रेशनवरील धान्य पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी आष्टीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे जागरण गोंधळ आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जागरण आंदोलन करून शेतकरी शिधापत्रिकेवरील धान्य पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनासाठी दि. 25 रोजी दुपारी कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले. आंदोलनात मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्यासह मनसे शेतकरी सेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष सोपान मोरे, आष्टी तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे, सुनील पाचपुते, जयदीप मिसाळ, लहू भवर, सतीश शिंदे, भरत चव्हाण, अशोक शिंदे आदी या सहभागी झाले होते. 
रेशन दुकानावर पूर्वी शेतकरी शिधापत्रिकेवर मिळणार धान्य पाच महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. शेतकरी शिधापत्रिकेवर पूर्वी आठ-दहा रुपये किलोने लाभार्थींना धान्य मिळत होते. सन 2015मध्ये फडणवीस सरकारने अन्नसुरक्षा याेजनेअंतर्गत शेतकरी शिधापत्रिकाधारकांना दोन-तीन रुपये किलोने गहू व तांदूळ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला होता. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून या शिधापत्रिकेवरील धान्य पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्याचा निषेध करीत हे धान्य पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारला जाग यावी, म्हणून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी