नागपूर हिवाळी अधिवेशणावर रोजंदारी मजदुर सेनेचा आक्रोश मोर्चा संपन्न- भाई गौतम आगळे
रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशणावर महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी प्रचंड आक्रोश मोर्चा दिनांक: २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात आला. अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
वीज क्षेत्रातील तसेच नगर विकास विभागांतर्गत सफाई कामगार, पाणी पुरवठा, अग्निशामक विभागातील सर्व कंत्राटी कामगारांना कायम / नियमित करा, नियमीत करेपर्यंत समानकाम - समानवेतन देण्यात यावे, २४ फेब्रुवारी २०१५ रोजी उद्योग, उर्जा व कामगार विभाग यांनी किमान वेतन अधिसूचना निर्गमित केली. त्याची आजतागायत अंमलबजावणी करण्यात आली नाही ती तात्काळ करण्यात यावी, अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्याचा सोयी-सुविधा तात्काळ लागू करा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा यु.एन.ए. नंबर सर्व कंत्राटी कामगारांना तात्काळ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने विधान भवनावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलिस प्रशासनाने एल.आय.सी. मार्गावर सदरील मोर्चा अडवून ठेवला.
तेथे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संतप्त कंत्राटी कामगारांनी जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. सदरील मोर्चा कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव, भाई गौतम आगळे सर, केंद्रीय प्रभारी सुभाष सिंग बावरे यांच्या नेतृत्वाखाली तर केंद्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. मोर्चात राज्यातील सर्व कंत्राटी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. यात प्रामुख्याने मराठवाड्यातून बहुसंख्येने सफाई कामगारासह इतर कंत्राटी कामगारांनी हजेरी लावली होती. मोर्चा यशस्वी होण्यासाठी संस्थापक सदस्य मनोज घरडे, महेंद्र बागडे, अमीत वसे, संतोष गोसावी, मराठवाडा अध्यक्ष राजेशकुमार जोगदंड, बीड जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे, उपाध्यक्ष आशा कांबळे, रेषमा बोराडे, कविता जोगदंड, सोणूबाई आचार्य, उषा बनसोडे, प्रणीता आचार्य, इत्यादी कामगारांनी अथक परिश्रम घेतले, अशी माहिती एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख भाई राजेशकुमार जोगदंड व नागपूर जिल्हा अध्यक्ष मनोज झोडापे यांनी दिली.
Comments
Post a Comment