साम टीव्ही मधील वृत्तनिवेदिका सेजल पुरवार यांनी आपल्या आजी विषयी लिहिलेले आठवणीतील ... क्षणचित्रे

साम टीव्ही मधील वृत्तनिवेदिका सेजल पुरवार यांनी आपल्या आजी विषयी लिहिलेले आठवणीतील ... क्षणचित्रे
             सेजल पुरुवार .नाशीक / मुंबई :-
आणि. माझी आजी आम्हाला सोडून गेली... मान्य आहे 95 वर्षांची होती ती, पण आई होती आमची सर्वांचीच... सर्वांची *माँ*

आजीच्या जाण्याने पपांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं...नातवंडांच्या आयुष्यातलं एक सुंदर पान हरवलं... आजीचा एक छोटासा निरागस पणतू आजी म्हणजे त्याच्यासाठीचा संस्कारांचा साठा होता... घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याची, जवळची व्यक्ती म्हणजे आमची माँ होती... पण आज ती नाहीय...

तीला जाऊन आज 13 दिवस उलटले पण एकही दिवस असा नाही जेव्हा तिची आठवण आली नसेल... आज वाटतयं आजी नावाचं सुख असावच प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही असत ओ शिकण्यासारखं...नेहमी फुललेली आनंदी आजी शेवटच्या क्षणी सुरकुतलेली पहिली, अनुभवली आजपर्यंत कधी तिला असं पाहिलं नाही म्हणून दुःख ही फार झालं... आजपर्यंत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता येत होतं पण आता ते शक्यच नाही आणि कधी तो अनुभव पुन्हा अनुभवता सुद्धा येणार नाही याचं दुःख... आणि आज नंतरच्या आमच्या पिढीला तीच सुख कधी मिळणार नाही याची खंत...

आजीला नव्वदीकडे झुकलेल पाहून सुद्धा कधी असं वाटलं नाही की ती इतक्या लवकर सोडून जाईल...एखाद्या कुटुंबात असलेला मायेचा संस्कारांचा अभाव केवळ आजी-बाबाच भरून काढू शकतात... बाबांचं प्रेम तर कधी मिळालं नाही पण आजी आतापर्यंत सोबत होती ही काहीतरी पुण्याई आणि भाग्यच असेल आमचं...

आजी हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक सुंदर पानच असतं... फक्त हे पान वाचता आलं पाहिजे... जगता आलं पाहिजे...कवेत घेता आलं पाहिजे...अनुभवलं पाहिजे... केवळ आणि तुम्हीच नव्हे तर प्रत्येकानेच...ज्याने आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं ना त्यालाच ते सुख कळत...

आता आजी बद्दल लिहितेय पण काय काय लिहू आणि किती लिहू हा प्रश्नच आहे ...तिला तिच्या आयुष्याकडून कुठलीच मागणी नव्हती... ना कुठली तक्रार होती... तिला कुठलाही मोह नव्हता ना कुठला गर्व होता... ना कुठला कपट तिच्या मनात असायचा... कुठलेही डावपेच तिला माहीत नव्हते... सरळ साधं वागणं... जे पोटात तेच ओठावर असायचं...उभ्या आयुष्यात तिने बरच काही बघितलं... बरच काही सहन केलं...पण आता असं वाटतं मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही त्याप्रमाणे तिच्या वाटेवर आलेल्या वेदना ह्या तुम्हा आम्हाला काय बरं कळणार?...

इतकी स्पष्ट आणि निखळ मनाची ती स्त्री होती की तिच्या वर्तवणूकीतून तिने दाखवून दिलं होतं कि, व्यक्तीपेक्षा वृत्ती महत्वाची असते आणि हे त्रिकाल सत्य आहे... वृत्ती कुणाच्याही हृदयात घर करू शकते पण व्यक्तीबद्दल हि शाश्वती देऊ शकत नाही आणि तिची वृत्ती खूप पारदर्शक होती... 

विचार केला तर आजकालच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी - बाबांचा सहवास खूप कमी झालाय पण तरीही माझी आजी अशी होती की जरी विभक्त कुटुंब पद्धती असली तरी तिने कधीच कुणालाच लांब केलं नाही... प्रत्येकाला ते प्रेम दिलं ती माया दिली ज्याची कमतरता आज भासतेय... संपूर्ण कुटुंब जोडून ठेवण्याचं काम तिने चोखपणे बजावलं.

आज ती नाहीय....बऱ्याच दिवसांनी घरी आल्यानंतरचा तिचा मुका फार मिस करते मी.फोन वर २ मिन का होईना पण जेवली का किती ग ते कष्ट जिवाच्या पलीकडे तिचं हे बोलणं फार आठवत. सकाळी सर्वांच्या आधी उठून तीच देवपूजा करणं इथून तिच्या दिवसाची सुरुवात मग ती कुठेही असो.टीव्ही बघायची ही फार आवड बर मझ्या आजीला.अख्खं लहानपण मी माझ्या आजी सोबतच घालवलं.कधीच एकटं सोडलं नाही तिने.आजीच ते केसांना तेल लाऊन देणं.तिच्या अनुभवातल्या गोष्टी ऐकण.सर्व काही आता आठवतं तर खूप त्रास होतोय ओ...पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळे सोबत रहा रे हे शेवट पर्यंत सगळ्यांना ठणकावून सांगणारी माझी आजी मला खूप आठवते.

आजी गेल्याचं दु:ख उरात ठेवत काम करणं . घरापासून लांब राहणं फार अवघड झालंय.एक ना अनेक प्रश्न आजीच्या जाण्याने टोचताय आता कुठे आपल्या जबाबदारीची जाणीव होतेय आजी गेली आणि दुसऱ्याच दिवशी मी कामाला आली शक्य असतं तर ते रद्द ही करू शकली असती पण आई वडिलांनीही हसतमुख चेहऱ्याने जा म्हणून सांगितलं . माझं काम माझी जबाबदारी होती आणि मी मोठ व्हावं ही मझ्या आजीचीही इच्छा होती.खूप खुश व्हायची ओ ती कुठेही असताना मला टिव्हीवर बघून सर्वांना कौतुकाने सांगायची देखील.शेवटच्या दिवसात आजीची सेवा करावी अशी माझी खूप इच्छा होती... परंतु माझ्या कामामुळे ते शक्य झालं नाही.माझ्या कामानं मला कुटुंबापासून दूर ठेवलं आणि याचं मी काहीच करू शकले नाही.माझं म्हणावं तितकं हे दुर्दैव.पण आता बाकी सर्वांना विनंती करावीशी वाटते की तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करा शक्य तितकं व्यक्त व्हा...तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी महत्त्वाच्या वेळी उपस्थित रहा... कारण आयुष्यातील ते नाजूक क्षण निघून गेले की ते कधीच परत आणता येत नाही... माणूस गेला की त्याला परत आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही.

"मृत्यू हे अंतिम सत्य आहे." मान्य आहे .हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या कुटुंबावर तो असलेला सर्वात मोठा आघात असतो. जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमचे सोडून जाते, कि जी परत आपल्याला कधीच दिसणार नसते.अशावेळी आपल्या सर्वांनाच मोठे दुःख होते.त्या कुटुंबातील व्यक्ती या खूपच हतबल होतात.आणि माझी तर आजी गेली ओ.आमची माँं.

पुण्यातमा होती ती... 
तिचा आत्म्यास चिरशांती लाभो हीच केवळ प्रार्थना...

या प्रेमळ माँं ची नात
सेजल पुरवार...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी