कारंजा मशीद जवळील खांबावर दिवा नसल्याने वर्षभरापासून परिसर अंधारात - एस.एम.युसूफ़

 
बीड (प्रतिनिधी) - शहरातील ऐतिहासिक कारंजाटावर जवळील कारंजा मशीद च्या बाजूस असलेल्या खांबावर जवळपास वर्षभरापासून दिवा नसल्याने या परिसरात अंधार आहे.  हा अंधार दूर करण्याकरिता येथील खांबावर दिवा लावणार कोण ? महावितरण कंपनी की बीड नगर परिषद असा प्रश्न मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून उपस्थित केला आहे.
            याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पञकात नमूद केले आहे की, बीड शहरातील प्रमुख भाग असलेल्या ऐतिहासिक कारंजा टावर परिसरातील कारंजा मशीद च्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावरील दिवा जवळपास एक वर्षापासून लावण्यात आला नाही. सदरील खांबावरून महावितरण ची मुख्य विद्युत वाहिनी गेलेली आहे तसेच दिवा लावण्यासाठी खांबावर पाईपही लावण्यात आलेला आहे. ज्यावर साधारण वर्षभरापूर्वी पर्यंत दिवा होता. जो चालू ही होता मात्र येथील दिवा कुठे गेला ? कसा गायब झाला ? हे एक कोडेच आहे. परंतु जेव्हापासून दिवा गायब झाला तेव्हापासून आतापर्यंत तिथे दुसरा दिवा लावण्याचे कष्ट ना महावितरण कंपनीने घेतले, ना बीड नगर परिषदेने. यामुळे गेल्या वर्षभरापासून कारंजा मशीद च्या एका बाजूच्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून खांबावरील दिव्या विना असलेल्या पाईप वर आता दिवा लावणार कोण ? महावितरण कंपनी की, बीड नगर परिषद असा प्रश्न मुक्तपञकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून उपस्थित केला आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी