शिक्षण म्हणजे सत्य जाणून सुसंस्कृत नागरिक बनणे - कॅप्टन राजाभाऊ आठवले
131 विद्यार्थ्यांना आम्रपाली व जय भीम बुद्ध विहार (पूरग्रस्त कॉलनी) वही पेन वाटप अभियान
बीड प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे सत्य जाणून सुसंस्कृत नागरिक बनणे,सर्वांशी मानवतेने वागून हिंसा,चोरी,खोटे बोलणे, व्यभिचार व मादक पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहून व त्यानुसार तसेच जीवनात आचरण करणे होय असे प्रतिपादन कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी केली.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या 51 व्या स्मृतिदिनी आम्रपाली बुद्ध विहार व जय भीम नगर बुद्ध विहार परिसरातील विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या दानातून वही पेन वाटप अभियानातील पाचव्या फेरी प्रसंगी विनम्र अभिवादन करून एकूण 131 विद्यार्थ्यांना वाटप केले.
अध्यक्षपदी असलेले कॅप्टन राजाभाऊ आठवले प्रमुख पाहुणे बी.डी. तांगडे, बप्पाजी जावळे, छाया शिंदे काशिनाथ वाघमारे, यांच्या हस्ते महामानवांना पुष्प, पुष्पमाला अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. जी.वानखडे यांनी केले व महामानव अभिवादन ग्रुप, सेवानिवृत्त बहुजन आधिकारी संघ, वाचाल तर वाचाल फिरते मोफत असलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.
कॅप्टन आठवले यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवन जीवन कार्यावर प्रकाश टाकताना,डॉ बाबासाहेब यांच्या सोबत सावलीप्रमाणे राहून केलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन केले. ते म्हणा पुढे म्हणाले की लहानपण हे पिठाच्या गोळ्याप्रमाणे असते, त्याला जसा आकार दिला जाईल तसे पदार्थ बनू शकतात तरी लहानपणी आई-वडिलांच्या, गुरुजनांच्या आज्ञाप्रमाणे राहून थोर व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील प्रगती करणे तसेच पालकांनी आपले पाल्य घडविण्याकरता पंचशीलाचे पालन करणे कसे गरजेचे आहे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक वंजारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास आयु. चंद्राबाई ठोकळ, सीताबाई वडमारे, निविदिता वडमारे, सुनंदा वाघमारे, मोहिनी बनसोडे, दीपा सुरवसे, सोनाली जोगदंड, बबीता कोरडे ,आयु. दादा हरिदास गायकवाड, विशंभर बनसोडे, अमरसिंह ढाका, राजेंद्र वडमारे, भानुदास गायकवाड व परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका विद्यार्थी उपस्थित होते. महिला समता सैनिक दलाच्या कीर्ती शिंदे,आरोही जाधव, मनीषा गायकवाड, व सुनंदा वाघमारे, पूजा ससाने ओके यांनी कार्यक्रम यशस्वी करता बहुमोल परिश्रम घेतली सरनातयने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment