नांदगाव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांचे विरोधात मंडळ अधिकारी आक्रमक , सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा, आकृतीबंधविषयी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी
महसूल प्रशासनातील मध्यम तालुका म्हणून नांदगाव तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करण्यास तहसीलदारांनी विरोध केल्यानंतर मंडळ अधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
नांदगाव तालुक्यातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकून
महसूल सहाय्यक व तलाठी यांनी यासंदर्भात शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे हे नेहमी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची तोंडी दमदाटी देतात. अशावेळी वरिष्ठ कार्यालयाने काही माहिती मागितल्यास कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची बैठक घेत नाहीत.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे हे आल्यापासून त्यांनी प्रशासनात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचे कामकाज सुरळी सुरू होते. परंतु तहसीलदार मोरे यांच्याकडे नांदगाव तहसील कार्यालयाचा कार्यभार आल्यानंतर त्यांनी कार्यालयीन आदेश काढून सर्व संकलन हे एकत्रित केले. त्यांच्या सोयीनुसार व शासनाने ठरवून दिलेल्या आकृतीबंध बदलून सोयीनुसार आदेश केले आहेत.
त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर निष्काळजीपणा घेऊन कर्मचारी यांचे खच्चीकरण होत असल्याचे म्हटले आहे.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर अव्वल कारकून संतोष डुंबरे, तलाठी गणेश शिरसाट, के पी पाटणकर पियू रायजाडे, डी डी बच्छाव, रा आर जाधव, एम एन पाटील, बाळनाथ पैठणकर, गोविंद काळे आदींसह 20 ते 25 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment