ग्रामीणमधील ९३ किमी पाणंद रस्ते कामाला आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजुरी

        लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ४९ गावातील ५३ शेत/ पाणंद रस्त्याच्या ९३ किलोमीटर कामाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत २३ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार मंजुरी दिली आहे.
         अनेक गावच्या शेत रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने तर काही ठिकाणी शेत रस्तेच नसल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावच्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन भाजपाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी अनेक गावच्या आणि वाडी तांड्यातील विविध शेत रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने लातूर ग्रामीण मतदार संघातील ४९ गावातील शेत रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्‍यात लातूर तालुक्‍यातील २५ गावात ४४ किलोमीटर, रेणापूर तालुक्‍यातील १५ गावात ३१ किलोमीटर आणि भादा सर्कल मधील ८ गावात १८ किलोमीटर याप्रमाणे जवळपास ९२.५० किलोमीटर शेतरस्‍त्‍यांना मातोश्री ग्रामसमृध्‍दी शेत/पाणंद रस्‍ते योजने अंतर्गत मंजूरी मिळाली आहे.
            लातूर ग्रामीण मतदार संघातील शेतरस्‍त्‍यांना मिळालेल्‍या मान्‍यतेत लातूर तालुका – खुंटेफळ १ किमी, रामेश्वर २ किमी, सामनगाव २ किमी, गातेगाव १.५ किमी, तांदुळवाडी २ किमी, काटगाव २ किमी, कासार जवळा २ किमी, भातांगळी २.५ किमी, मुरुड १ किमी, गुंफावाडी १ किमी, चिंचोली ब. १ किमी, कासारखेडा २ किमी, बोडका १ किमी, दिंडेगाव १ किमी, मसला २ किमी, शिराळा २ किमी, रुई २ किमी, सारसा २ किमी, भोईसमुद्रगा २ किमी, कोळपा २ किमी, ढोकी २ किमी, रामेगाव २ किमी, भडी २ किमी, टाकळी शि. २ किमी, ममदापूर २ किमी, रेणापूर तालुका – पानगाव ४.५० किमी, फरदपूर २ किमी, वाला १.५० किमी, गरसुळी २ किमी, मोरवड २ किमी, बिटरगाव २ किमी, भोकरंबा २ किमी, मुरढव २ किमी, कुंभारवाडी २ किमी, तळणी २ किमी, मोहगाव २ किमी, नरवटवाडी १ किमी, मुसळेवाडी २ किमी, रामवाडी ख. १.५० किमी, कारेपूर २ किमी आणि भादा सर्कल मधील – उटी बु. २ किमी, सिंदाळा २ किमी, भेटा२ किमी, सत्तरधरवाडी २ किमी, टाका २ किमी, कवठा केज २ किमी, काळमाथा २ किमी, वरवडा २ किमी, येल्लोरीवाडी २ किमी याप्रमाणे मंजूरी मिळाली आहे.
          सदरील कामासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून निधी उपलब्ध होणार असून ही सर्व कामे २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुरू करण्याच्या अटीवर शासनाने मंजुरी दिली असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, मतदार संघातील ४९ गावातील ५३ शेत पाणंद रस्त्यांना जरी मंजुरी मिळाली असली तरी उर्वरित प्रस्तावित केलेल्या कामांना येत्या पंधरा दिवसात राज्‍य शासनाकडून मंजुरी मिळणार आहे. मतदार संघातील ९३ किलोमीटर शेत रस्त्याच्या कामाला मान्यता दिल्याबद्दल राज्‍याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांचे भाजपाचे नेते आ. रमेश कराड यांनी आभार मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी