डाॅ.गणेश ढवळेंना पद्मपाणी राष्ट्रीय/राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार जाहीर
___
पद्मपाणी प्रतिष्ठान बीड यांच्यामार्फत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मपाणी राष्ट्रीय/राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार २०२३ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जाहीर झाला असून येत्या मार्च मध्ये बीड मधील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलिपजी तरकसे यांनी माहितीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
प्रतिवर्षी पद्मपाणी प्रतिष्ठान द्वारे सामाजिक, पत्रकारीता,शैक्षणिक,उद्योजक,साहित्य, प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तिंना पद्मपाणी राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून २०२२-२३ या वर्षातील उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा येत्या मार्च मध्ये बीड मधील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment