आगामी काळात अँड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतील...
आगामी काळात अँड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतील...
अध्यक्ष इंजि.किशोर हंबर्डे यांचे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन.
आष्टी। प्रतिनिधी
पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आता अँड. बी.डी हंबर्डे या नावाने अत्याधुनिक अभ्यासक्रमामुळे सुसंपन्न झाले आहे.. या रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम होणार आहेत..
या महाविद्यालयातून राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिग्गज विद्यार्थी चमकले आहेत.
मात्र अद्यापही यूपीएससी या स्पर्धा परीक्षेमध्ये अद्याप यश मिळालेले नाही परंतु आम्ही लवकरच या स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील असे विद्यार्थी घडवणार आहोत त्या प्रकारची अभ्यासक्रमाची संधी त्यांना निर्माण करून देणार आहोत असे दुर्दम्य आत्मविश्वास पूर्ण प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष इंजि. किशोर हंबर्डे यांनी केले...
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अँड बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभामध्ये अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते..
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, उत्तम बोडखे, अविनाश कदम, अविशांत कुमकर, निसार शेख,द्रोणाचार्य फाउंडेशनचे टकले, संस्थेचे सचिव अतुल मेहेर,संचालक दिलीप वर्धमाने, सुभान पठाण, महेश चौरे, प्राचार्य डॉ.सोपानराव निंभोरे इत्यादी उपस्थित होते इंजि. किशोर हंबर्डे पुढे बोलताना म्हणाले की या महाविद्यालयाने विविध अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत यावर्षी सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना नीट जेईई इत्यादी अभ्यासक्रमासाठी लातूर येथे किंवा कोटा राजस्थान या ठिकाणी क्लासेस लावण्यासाठी जावे लागते त्यासाठी गरीब पालकांना देखील मोठी फीस भरावी लागते आणि त्या ठिकाणी राहण्याचा जाण्या येण्याचा मोठा खर्च होत असल्यामुळे ही कुटुंबे अडचणीत येतात या कुटुंबाची फरपट होत असते हे कष्ट कमी व्हावेत यासाठी संस्थेच्या वतीने तज्ज्ञ शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांसाठी आष्टी येथेच नीट तसेच इतर अभ्यासक्रमांसाठी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे त्यासाठी द्रोणाचार्य अकादमी यांचे सह संयुक्तरीत्या उपक्रम सुरू करणार आहोत त्यातूनच यापुढे यूपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण करणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडतील असा आत्मविश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना द्रोणाचार्य फाउंडेशनचे टकले बोलताना म्हणाले की २१ वे शतक हे ज्ञानाचे असल्यामुळे जो विद्यार्थी ज्ञान संपादन करून स्पर्धेत राहील त्याचेच भवितव्य घडणार आहे आगामी काळात या तालुक्यातील ऊस तोडणी कामगार कष्टकरी शेतकरी यांच्या मुलांसाठी सवलतीच्या दरात नीट आणि जे इ हा अभ्यासक्रम तज्ञ शिक्षकांद्वारे आष्टी येथेच शिकवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी बराक ओबामा नेल्सन मंडेला एपीजे अब्दुल कलाम पंतप्रधान नरेंद्र मोदी धीरूभाई अंबानी यांनी ज्या विपरीत परिस्थितीवर मात करून संपादन केले आहे तो आदर्श विद्यार्थ्यांनी आपला समोर ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले वर्ष स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमांमध्ये पोलीस निरीक्षक सलीम चाऊस,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांना मराठी पत्रकार संघ मुंबई पुरस्कार निमित्त पत्रकार उत्तम बोडखे यांना शब्दगंध साहित्य पुरस्कार निमित्त अविनाश कदम आणि अनिरुद्ध धर्माधिकारी यांना गंगाई बाबाजी पुरस्कारा निमित्त तसेच अविशांत कुमकर, डॉ हुमायुद्दिन सय्यद यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदके वितरित करण्यात आली सुरुवातीला प्राचार्य डॉ सोपानराव निंभोरे यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयांची सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ अभय शिंदे, प्रा सय्यद अल्लाउद्दीन, प्राध्यापिका सायली हंबर्डे यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ रवी सातभाई यांनी केले.
त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी बहारदार कला आविष्कार सादर केला.
Comments
Post a Comment