मन्यारवाडी केंद्रातील केंद्र प्रमूख मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची माहे जानेवारी ची शिक्षण परीषद संपन्न
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड येथील प्राचार्य जयपाल कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मार्गदर्शक पत्रानुसार केंद्रातील शिक्षकांचे शैक्षणिक मंथन होऊन प्रत्येक मुल शिकावं यासाठी नियोजन या हेतूने शिक्षण परीषद आयोजित करण्यात आली होती
विषय क्रमांक एक शाळा स्तरावरील अध्ययन स्तर निर्धारणा नंतरचा कार्यक्रम
विषय क्रमांक दोन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
विषय क्रमांक तीन शालेय आरोग्य
विषय क्रमांक चार व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन
वरील चार विषयावर सुलभक सुनिल गवारे सर लहू पुरी सर पोटे सर संतोष शिंदे सर भाऊसाहेब बारगजे सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले सदरील शिक्षण परिषदेचे अध्यक्ष पद प्रभारी मुख्याध्यापक श्री शिवाजी सानप यांनी भुषविले व प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख श्री सुनील कुर्लेकर सर व केंद्रीय मुख्याध्यापक श्री भारत येडे सर हे होते
शिक्षण परिषदेस सर्व शिक्षक उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद शिंदे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन काशिद सर यांनी मानले चहापान व भोजन कार्यक्रमानी परिषदेची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सानप सर काशिद सर सराफ सर कोळी सर श्रीमती शेळके मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा उपक्रम कार्यक्रमाधिकारी श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद
Comments
Post a Comment