सर्वधर्म प्रार्थनेने महात्मा गांधींना अभिवादन
मालेगाव (प्रतिनिधी)- येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून तसेच सर्वधर्म प्रार्थना सामुहिकरीत्या म्हणून अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी अजीज एजाज, आनंद गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर, माजी जिल्हा संघटक रविराज सोनार, माजी जिल्हाध्यक्ष विलास वडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, जेष्ठ सेवा दल सैनिक राजीव वडगे, सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, तालुका कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे, बळवंत अहिरे, अशोक व्याळीज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment