नाशिक मध्ये स्वराज्याचा भगवा फडकणार,डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली
नाशिक मध्ये स्वराज्याचा भगवा फडकणार
डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.
छत्रपती संभाजी राजे यांचा नाशिक दौरा आत्ताच पार पडला या दौऱ्या दरम्यान कार्यकर्ता मेळावा घेऊन छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याचे शिलेदार निवडले यातच स्वराज्य संघटनेचा विस्तार महाराष्ट्रभर होत असताना नाशिक हे केंद्रस्थानी ठेवून सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याच्या नियुक्ती देण्यात आल्या यावेळी छत्रपती संभाजी राजे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व ग्रामीण भागात अतिशय उत्तम संपर्क असणारे डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी राजांनी मार्गदर्शन करताना स्वराज्य हे प्रस्थापितांचे नसून विस्थापितांचा आहे असे सांगितले त्यातूनच नवीन व अभ्यासू नेतृत्व घडवणार असल्याची ग्वाही संभाजी राजांनी दिले महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागावा व या महाराष्ट्राच्या मातीत नवीन नेतृत्व घडावे व महाराष्ट्राला नव उंचांक गाथा यावा यासाठी स्वराज्य कटीबद्ध राहील स्वराज्य हे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा आहे हे समाजातील प्रत्येक विस्थापित व अन्याय झालेल्या घटकांना न्याय देण्यासाठी लढेल.
डॉक्टर रुपेश नाठे यांनी शाळेत असतानाच हिंदवी स्वराज्य ग्रुप ची स्थापना केली व त्या माध्यमातून अनाथ आश्रम व वृद्धाश्रमात मदत केली आपल्या परिचयातील युवकांचा वाढदिवस असल्यावर वाढदिवसाचा अर्धा खर्च हा अनाथ आश्रम व वृद्ध आश्रमात मदत करण्यासाठी वापरावा असा त्यांनी सर्वांना आग्रह केला व त्या पद्धतीने काम उभा राहिला त्यानंतर ग्रामीण भागात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून ते सर्वांच्या परिचयात आले त्यानंतरच्या काळात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून सोडवले व कोविड काळात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी मांडले त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली परंतु प्रश्न मार्गी लागले नाही त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या या 50 हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न छत्रपती संभाजी राजांच्या माध्यमातून सोडवला गेला याचा सर्वच स्तरावरून कौतुक झालं छत्रपतींनी देखील कोविडमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नाशिक ते कोल्हापूर प्रवास केला यासाठी पाठीवर हात ठेवला व शाबासकी दिली . हा पाठीवरचा हात एक नव नेतृत्व घेऊन आला व पुढे रुपेश नाठे यांनी अगदी जोमाने काम उभं केलं त्यातूनच त्यांना मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभलं. पुढे नाशिक येथील नामांकित चेहरा स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या ते संपर्कात आले व नाशिक शहरांमध्ये हे त्यांना चांगला जनसंपर्क मिळाला छत्रपती संभाजी राजे यांनी भाषणादरम्यान रुपेश नाठे यांचा माझा पठ्या म्हणून उल्लेख केला व त्यापुढे रुपेश नाठे यांना छत्रपतींचा पठ्या म्हणून ओळख मिळाली. डॉक्टर रुपेश नाठे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा मी लहानपणापासून भक्त आहे व त्याचाच हे फळ मला आज मिळाले की स्वतः छत्रपतींच्या वंशज यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला व मला आशीर्वाद दिले मी नक्कीच स्वराज्याच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरिबाचे व कष्टकऱ्याचे सेवा करेल व त्यांना न्याय मिळवून देईल
Comments
Post a Comment