डाॅ.गणेश ढवळे रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

 
___
रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत "मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा " राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२३ आज दि.२९ जानेवारी रविवार रोजी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांच्या हस्ते चित्रपट कलाकार आदि. मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.यावेळी सहकारी शेख युनुस च-हाटकर उपस्थित होते. 
            कार्यक्रमाचे प्रस्तावित ओमप्रकाश गिरी यांनी केले तर रयत सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आर. जी. माने यांनी आभार मानले 
 रयत सामाजिक प्रतिष्ठानचे सभासद ॲड. संगीताताई धसे,चित्रपट अभिनेते संतोष वारे,उदय देशमुख ,उपाध्ये सर,संतोष कुराडे,विकास धोत्रे,किशोर सोनावणे आदि उपस्थित होते. 


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी