लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सरपंच सौ. शाहू विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वसंतनगर येथे सरपंच सौ.शाहू विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. 
         लमानतांडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय वसंतनगर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहन सरपंच सौ. शाहू विजय राठोड यांच्या हस्ते दि 26 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले. दरम्यान या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
सरपंच सौ. शाहू विजय राठोड यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी