मूकनायक दबलेल्या लोकांचा आवाज होते - यशवंत भंडारे
मूकनायक दबलेल्या लोकांचा आवाज होते - यशवंत भंडारे
तुलसी कॉलेज मध्ये मूकनायक दिन साजरा
बीड(प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकची स्थापना करून दबलेल्या पिचलेल्या लोकांचा आवाज बुलंद केला. मूकनायक दबलेल्या लोकांचा आवाज होते असे प्रतिपादन माजी उप संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,महा.राज्य यशवंत भंडारे यांनी केले. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, सभागृह बीड येथे दि. ३१ जानेवारी २०२३ सकाळी ११ वा. मूकनायक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत टाईम्स बीड जिल्हा प्रतिनिधी प्रा. सि. आर. पटेल, संपादक वैभव स्वामी, तुलसी कॉलेज ऑफ आयटी चे प्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती.
प्रस्ताविकात प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत बाबासाहेबांच्या सर्व समावेशक समाज हिताच्या पत्रकारिता विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना भंडारे म्हणाले की,भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही असा ठाम विश्वास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा होता असे सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी लोकमत टाईम्स बीड जिल्हा प्रतिनिधी प्रा. सि. आर. पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.प्रदिप रोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकत सद्य परिस्थितीत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया माध्यमातून समाज जागृती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मूकनायक सोहळ्याचे आयोजन तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड,तुलसी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, बीड यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश कोरडे यांनी केले तर आभार प्रा. सुरेश कसबे यांनी मानले.यावेळी संस्थेतील प्रशासकीय अधिकारी सुदर्शन भालेराव, प्रशासकीय अधिकारी अस्मिता साळवे तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment