गेवराई तहसील कार्यालयासमोरील जवंजाळ मल्टी सर्विसेस येथे ग्राहकांची भरमसाठ लूट

गेवराई तहसील कार्यालयासमोरील जवंजाळ मल्टी सर्विसेस येथे ग्राहकांची भरमसाठ लूट

प्रशासनाने लक्ष घालून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869:-
गेवराई तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मुख्य गेट समोरील जवंजाळ मल्टी सर्विसेस मध्ये भोळ्या भाबड्या ग्राहकांची भरमसाठ लूट होत आहे अशा अनेक तक्रारी आहेत.मात्र ह्या लुटमारीची योजना खरोखरच चालू आहे हे सोमवार दि.३० रोजी पहायला मिळाले.चक्क वीस रूपयांना एक झेरॉक्स प्रत या भामट्या दुकान चालकानं दिली.हा दुकानदार खूप जास्त पैसे घेतो याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे चर्चा नेहमीच तहसील कार्यालयासमोर लोकांमध्ये ऐकायला भेटते.या दुकानदाराच्या दरांकडे लक्ष देऊन यावर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी चर्चा लोकांमध्ये पहायला मिळाली.गेवराई तहसील कार्यालयासमोर हा भामटा लूटारू बसला असून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी चर्चा लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे. चक्क एका प्रिंट चे वीस रूपये घेऊन परत पाच रुपयांची मागणी करणारा हा भामटा लूटारू आहे.याचे दुकानाचे लायसन्स रद्द करून यावर योग्य तो दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांची आहे.याचा योग्य वेळी बंदोबस्त केला नाही तर हा भामटा तालुक्यातील जनतेच्या खिशाला लागलेली किड ठरेल .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी