शेवगांव शहरातील त्या वादग्रस्त बांदकामाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर व मा मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांना सादर केले आहे सदरील बांधकामा बाबतचा वादाचा विषय हा संपुष्टात आलेला आहे
शेवगांव शहरातील त्या वादग्रस्त बांदकामाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर व मा मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांना सादर केले आहे सदरील बांधकामा बाबतचा वादाचा विषय हा संपुष्टात आलेला आहे
{ अविनाश देशमुख शेवगांव }
मौजे शेवगाव येथील गट क्रमांक ११२४ पैकी ०० हे. ०२ आर या शासकीय मालकीच्या जागेवर कोणीतरी एक इसम अतिक्रमण करून बांधकाम करत असले बाबत चा अर्ज वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे आल्यानंतर सदर बांधकाम शासकीय जागेत सुरू असलेबाबत/ नसलेबाबत चौकशी करण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी मार्फत मा. मुख्याधिकारी साहेब, नगरपरिषद शेवगाव आणि मा. तहसीलदार साहेब शेवगाव यांना दिनांक २३/११/२०२२ रोजी निवेदन देण्यात आलेले होते सदर निवेदनामध्ये सदरील बांधकाम हे शासकीय जागेमध्ये असल्यास त्याविरुद्ध कारवाई करणे कामी चौकशी करण्यासाठी नमूद करण्यात आले सदरील अर्जदार चौकशी न झाल्यास दि. ०१/१२/२२ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याबाबत ही कळविण्यात आलेले होते. सदरील वंचित बहुजन आघाडीच्या अर्जाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद शेवगाव यांचे मार्फत तातडीने सुनावणी घेण्यात आलेली आहे. सदरील सुनावणी दरम्यान ॲड. मंडोरे यांचेमार्फत सादर करण्यात आलेली कागदपत्रे, गट क्रमांक ११२४ यासी जुना सर्व्हे नंबर ३अ यांसी भूमी अभिलेख कार्यालयातील मालमत्ता/भूमापन क्रमांक १६२८ असलेबाबतचे पुरावे आणि गट क्र. ११२४ यांचे संपूर्ण क्षेत्र हे ०२ आर असलेबाबतची व सदरील क्षेत्र कुठून कुठपर्यंत असलेबाबतची माहिती सादर करण्यात आल्यामुळे सर्व माहिती आणि कागदपत्रांच्या अनुषंगाने सदरील इसमाद्वारे सुरू असणारे बांधकाम हे शासकीय जागेत नसल्याबाबतचे सर्व अभिलेख ऍड मंडोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर मा मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांना सादर केले आहे सदरील बांधकामा बाबतचा वाद विषय हा संपुष्टात आलेला आहे.
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Comments
Post a Comment