डॉक्टरांनी काढला चक्क मेंदुमधुन दगड


डॉक्टरांनी काढला चक्क मेंदुमधुन दगड...

शिर्डी,राजेंद्र दूनबले 

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये न्‍युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी यांच्‍या न्‍युरो ओटीच्‍या टिमने गेल्‍या पाच महिन्‍यापासुन मेंदुमध्‍ये रुतलेला दगड काढण्‍याची शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडली असुन या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेबद्दल संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सर्व न्‍युरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.
                 श्री साईबाबा संस्‍थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयात राज्‍याच्‍या कानाकोप-यातुन तसेच राज्‍याबाहेरील हजारो रुग्‍ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात. यारुग्‍णालयामध्‍ये मेंदु शल्‍य विभागात (Neurosurgery) दर महिन्‍याला साधारणत सरासरी ६० ते ७० मेंदु आणि मणक्‍याच्‍या शस्‍त्रक्रिया होतात. त्‍यातच एक परभणीचे रुग्ण श्री.सचिन मारके वय वर्ष ३७ हे गेल्‍या पाच महिन्यापासून डोक्याला झालेली जखम घेवुन श्री साईबाबा हॉस्पिटल येथे तपासणीसाठी न्युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी यांच्याकडे आले. साधारणत: पाच महिन्यांपुर्वी (ऑगास्ट २०२२) दुचाकी वरून पडण्याचे निमित्त झाले अन् डोक्याला एक छोटी जखम झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी जखम मात्र बरी होण्याचे नाव घेत नव्हती. औषधे, मलम-पट्टी झाले, मग सीटी स्‍कॅन ही झाला. पण निदान झाले नाही. जखमेतुन पाणी येणे बंद होत नसल्यामुळे डिसेंबर मध्ये परत सिटी स्कॅन करून औषध चालु केले गेले. तरी पण डोक्याची जखम दाद देत नव्हती.
                शेवटी शिर्डीचे श्री साईबाबा हॉस्पिटल आणि डॉ.मुकुंद चौधरी यांचे नाव ऐकुन रुग्ण पाच महिन्यानंतर उपचारासाठी शिर्डीमध्ये आला. पेशंटची केस पुर्ण समजावुन घेत डॉ.मुकुंद चौधरी यांनी पुन्हा सीटी स्कॅनचा सल्ला दिला. सीटी स्कॅन पाहुन मात्र डॉक्टर ही बुचकळ्यात पडले. कवटीचे हाड तोडून मेंदुमध्ये त्याची गाठ झाली असं प्रथमदर्शनी वाटत असले तरी पाच महिने उपचार घेवुन ही गाठ का झाली? हा प्रश्‍न सुटत नव्हता. डॉ.चौधरी यांना ती हाडाची गाठ नसुन काहीतरी इतर पदार्थ असल्याची शंका आली. रेडिओलॉजिस्ट डॉ.श्रीकांत नागरे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी ही इतर पदार्थ असल्याची शक्यता व्यक्त केली. योग्य निदान होत नसल्यामुळे पेशंट व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून शस्‍त्रक्रियाची तयारी करण्यात आली. दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी न्युरो सर्जन डॉ.चौधरी व वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ.संतोष सुरवसे आणि न्यूरो ओटी टीम यांनी जरा उत्सुकतेनेच ह्या ऑपरेशनला सुरुवात केली. पण सर्जरी करताना जी गोष्ट दिसली त्याने डॉक्टर ही चक्रावुन गेले. कवटीचे हाड तोडून एक मोठा दगड मेंदुमध्‍ये खोलवर जावुन बसला होता. आजुबाजुच्या भागाची सर्जरी करून इतर भागाला धक्का न लागु देता मेंदुमधील दगड अलगद काढण्यात डॉ.चौधरी यांना यश आले. शस्‍त्रक्रियेनंतर १० ते १२ दिवस झाले असुन रुग्‍णाला कुठलाही त्रास झाला नाही. तसेच झालेल्या जखमेतुन पाणी येणे ही बंद झाले. पाच महिन्यापासुन मेंदुमध्ये दगड असताना ही रुग्‍ण वाचने, त्याचे निदान न होणे आणि शस्‍त्रक्रियेनंतर ही सुखरूप रहाणे ही जागतिक वैद्यकीय क्षेत्रतील दुर्मिळ केस असल्याचे ही डॉ.मुकुंद चौधरी यांनी नमुद केले.
                अशाप्रकारे दुर्मिळ आणि अवघड शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍याबद्दल संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ.शैलेश ओक व उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी सर्व न्‍युरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

नितीन काळे यांचा तलावात बुडून मृत्यू!