सोयगाव पोलीस स्टेशन व शांताई फाउंडेशन वाकोद यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न






सोयगाव,दि.२९( प्रतिनिधी मुश्ताक शाह)
येथील पोलीस ठाणे सोयगाव येथे ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण,सुनिल लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण,डॉ.विजयकुमार मराठे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड,यांचे मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे सोयगाव येथे दि.२६ जानेवारी रोजी पोलीस ठाणे सोयगाव व शांताई फाउंडेशन वाकोद यांचे संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सोयगाव न्यायालय न्यायाधीश अमोल इंगोले यांनी केले,सदर रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे व रक्तदाते सोयगाव तहसीलदार रमेश यशवंत यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आहे.
सदर भव्य रक्तदान शिबिरामध्ये पोलीस ठाणे सोयगाव,सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार सह पोलीस अंमलदार मिळून यांनी ८ रक्तदान करून सहभाग नोंदीला तसेच सोयगाव येथील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून एकूण १६ रक्तदाते यांनी ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद देण्यात आला असून रक्तदाते यांना प्रमाणात ही देण्यात आले आहे.
सोबत फोटो:-

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी