सुभाष वाव्हळ पत्रकारितेतील निष्काम कर्मयोगी - पंजाबराव मस्के
सुभाष वाव्हळ पत्रकारितेतील निष्काम कर्मयोगी - पंजाबराव मस्के
लोकमान्य टिळक महाविद्यालयात केला गौरव सन्मान
वडवणी (प्रतिनिधी) मागील ४० वर्षांपासून वडवणी सारख्या ग्रामीण भागात अत्यंत खडतर परिस्थितीतून पत्रकारितेचा पायंडा रचलेले शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांचे पत्रकारितेतील योगदान खरोखरच अतुलनीय असे आहे. पत्रकारितेप्रती त्यांची असलेली निस्वार्थी निष्ठा, श्रध्दा व प्रामाणिकपणा हे आजच्या तरुण वर्गाला प्रेरणादायी असून केवळ दिखाऊपणा करणाऱ्यांसाठी हे एक प्रकारचे झणझणीत अंजन आहे. रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड होणे म्हणजे त्यांच्या कार्याचा एक प्रकारे गौरवच झाला आहे. त्यांच्या निवडीचा उलट पतसंस्थेला आता अधिक फायदा होणार असून पतसंस्थेच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल याची आपणास शाश्वती आहे. असे गौरवोदगार लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के काका यांनी महाविद्यालयातील त्यांच्या गौरव सन्मानाप्रसंगी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील दैनिक झुंजार नेताचे तालुका प्रतिनिधी तसेच शासकीय अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव दिगांबरराव वाव्हळ यांची नुकतीच शहरातील नामांकित रामलिंग पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबध्दल दि.२६ जानेवारी २०२३ गुरुवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक वरिष्ठ महाविद्यालयात त्यांचा गौरव सत्कार संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव मस्के पाटील, प्राचार्य डॉ.के.एम.पवार, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील, प्राध्यापक निंबाळकर, वडवणी तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे, युवराज मामा शिंदे, शिवाजीराव मस्के पोलीस पाटील यांसह इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डाॅ.अशोक खेत्री यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव मस्के पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, महाविद्यालयात कालच्या सरपंच उपसरपंच यांच्या कार्यशाळेतच हा सत्कार आयोजित न करता आज मुद्दामहून भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज हा सत्कार संपन्न होत आहे. सुभाष भाऊ यांनी पत्रकारितेत प्रदिर्घ काम केलेले आहे. आजच्या बदलत्या आव्हानाला सामोरे जाताना त्यांनी या क्षेत्राला पूर्ण वाहून घेतलेले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील वडवणी तालुक्यातील ज्येष्ठ निष्काम कर्मयोगी असे त्यांच्याबध्दल म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांची शहरातील रामलिंग पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबध्दल त्यांचा महाविद्यालयात सत्कार संपन्न होत आहे याचा आपणांस आनंद वाटतो आहे असेही शेवटी मस्के म्हणाले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment