वडवणीतील दंत व मुखरोग तपासणी शिबिराचा सैनिक व पत्रकारांनी घेतला लाभ

वडवणीतील दंत व मुखरोग तपासणी शिबिराचा सैनिक व पत्रकारांनी घेतला लाभ 

माळवदे परिवाराचा समाजाप्रती असलेला सेवाभाव प्रेरणादायी - नगराध्यक्ष शेषेराव जगताप 

वडवणी,दि.२८(प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनानिमित्त वडवणीतील डॉ.माळवदे दातांचा दवाखाना यांच्या वतीने सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिर हा अभिनव उपक्रम समाज विधायक असून देशाच्या सीमेवर भारत मातेचे रक्षण करुन देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक शिवप्रसाद माळवदे व त्यांचे चिरंजीव डॉ.अक्षयकुमार माळवदे सुनबाई डॉ.सौ.दिक्षा माळवदे यांनी या उपक्रमातून हे निभावलेले सामाजिक दायित्व संपूर्ण वडवणी शहरासाठी निश्चितपणे अभिमानास्पद असून या शहराचा नगराध्यक्ष या नात्याने आपल्यासाठीही या माळवदे कुटुंबीयांचा सेवाभाव प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार वडवणी नगरीचे नगराध्यक्ष शेषेराव बाप्पु जगताप यांनी याप्रसंगी काढले. 
                                          याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नुकतेच दि.२६ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी वडवणी शहरातील डॉ.माळवदे यांचा दातांचा दवाखाना यांच्या वतीने सीमेवर भारत मातेचे रक्षण करणारे व सेवानिवृत्त झालेले सर्व आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वडवणी शहरातील ज्येष्ठ नेते अंकुशराव शिंदे पाटील, नगराध्यक्ष शेषेराव बाप्पु जगताप, उपनगराध्यक्ष बन्सीधर भाऊ मुंडे, सेवानिवृत्त तलाठी नारायणदादा शिंदे, सभापती नागेश डिगे, नगरसेवक सचिन सानप, डॉ.सतिश मुंडे, डॉ.सुरेश मुंडे, शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ, संपादक अनिल वाघमारे, पत्रकार तथा उपसरपंच अशोक निपटे, पत्रकार विनायक जाधव, पत्रकार विनोद जोशी, पत्रकार महेश सदरे, पत्रकार सुधाकर पोटभरे, पत्रकार सतिश सोनवणे, पत्रकार धम्मपाल डावरे, पत्रकार ओमप्रकाश साबळे, पत्रकार अशोक फपाळ, पत्रकार गितांजली वानखेडे, प्रा.अशोक खेत्री, पांचाळ साहेब, राठोड साहेब, भारती साहेब, विठ्ठल जाधव, दिपक खोकले, राजेश तोगे तसेच माजी सैनिक रामराव मुंडे, अनुरथ कोठूळे, कराड साहेब, गोपीनाथ बडे, अनंत मस्के, निळकंठ होंडे, विश्वनाथ बडे, कल्याण मुंडे, सौ.दिपाली कल्याण मुंडे यांसह वडवणी शहरातील असंख्य मान्यवर व नागरिक यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत माता व अमर जवान स्तंभ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माळवदे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे राष्ट्रध्वज देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शेषेराव बाप्पु जगताप, उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे, ज्ञानेश्वर वाव्हळ यांसह आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पत्रकार अशोक निपटे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार माजी सैनिक शिवप्रसाद माळवदे यांनी मानले. या मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिराचा वडवणी तालुक्यातील असंख्य आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार बांधव व त्यांचे कुटुंबीय यांनी सहभागी होत लाभ घेतला. या सर्वांची दंत व मुखरोग तज्ञ डॉ.अक्षयकुमार माळवदे तसेच दंत व मुखरोग तज्ञ डॉ.सौ.दिक्षा माळवदे यांनी तपासणी करुन निदान केले. भरगच्च प्रतिसादाने हे शिबिर यशस्वी ठरले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक तथा माजी सैनिक संघटनेचे वडवणी तालुकाध्यक्ष शिवप्रसाद लक्ष्मणराव माळवदे, सौ.चंद्रकलाताई शिवप्रसाद माळवदे, दंत व मुखरोग तज्ञ डॉ.अक्षयकुमार शिवप्रसाद माळवदे तसेच डॉ.सौ.दिक्षा अक्षयकुमार माळवदे यांनी परिश्रम घेतले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी