डोंगरकिनीच्या सोनवणेचा प्रताप गटात इंचभर ही जमीन नसताना केला विक्री व्यवहार चौकशी करून संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा मधुकर येवले यांची मागणी


पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी शिवारातील गट नंबर 37 मधे सुलोचनाबाई हरिभाऊ सोनवणे यांची इंचभरही जागा नसताना दिनांक 18 /01/2023 रोजी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर सोनवणे यांनी नोटरीद्वारे 01 आर जागा 35000 रुपयाला विकली ही बाब गट नंबर 37 मधील शेतकऱ्यांला मिळाल्याने डोंगरकिनी शिवारातील गट नंबर 37 मधील शेतकरी भयभीत झाले असून ह्या गंभीर प्रकरणाची डोंगरकिनी परिसरात चर्चा झाल्याने खळबळ उडाली असून लोक चर्चा करु लागले गटात इंचभरही जागा नसताना शेतकऱ्यांच्या परस्पर जमीन कशी विकता येते का ? डोंगरकिनीतील एका पञकाराने आपली पावर वापरून स्टॅम्पवर खोटे अंगटे केले आहेत अशी बी चर्चा असल्यामुळे ह्या संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोंगरकिनी गटाचे युवानेते मधुकर येवले यांनी केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी