शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आ. विक्रम काळेंचा विजय 'विक्रमी' करा- बाजीराव भैय्या धर्माधिकारी

शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आ. विक्रम काळेंचा विजय 'विक्रमी' करा- बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या विक्रम काळेंचा विजय निश्चित असुन हा विजय शिक्षक बंधु भगिनींनी 'विक्रमी' करावा असे आवाहन परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

     महाआघाडीचे सरकार असताना शिक्षकांना जुन्या पेन्शनचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात होता. आणखी काही काळ सरकार असते तर तो अतापर्यंत मार्गी लागला असता. विक्रम काळे हे शिक्षकांचा प्रश्‍न म्हटले की, अगदी रस्त्यावर उतरून काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मागील १६ वर्षांत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी विक्रम काळे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. 


     आ.विक्रम काळे आ.धनंजय मुंडे यांचे विधिमंडळातील निकटचे सहकारी आहेत.आ.काळे मागील सोळा वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात कायम कामात आहेत. ते प्रत्येकाच्या अडीअडचणीला धाऊन जातात. त्यांनी प्रत्येकाच्या अडचणी सोडविल्या आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित आहे. त्यांनी आमदारकीचे हे काम व्रत म्हणून स्वीकारले आहे. त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन त्यांच्या विजयाचा 'विक्रम' निर्माण करा असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी