आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे पालकांचे लक्ष

आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू; प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे पालकांचे लक्ष

तपासणीसाठी समिती; संस्था चालकांच्या मर्जीने समिती गठित करू नका :- मनोज जाधव

आरटीई प्रवेशाच्या अनुदानापोटी जिल्ह्यातील शाळांना अडीच कोटी रुपयांचा निधी वाटप


बीड (प्रतिनिधी)प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची प्रक्रिया आणखी सुरू झाली नाही. मात्र सोमवार दी.२३ पासून शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. आता प्रवेशाच्या वेळापत्रकाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. गत वर्षी डिसेंबर महिन्यातच आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले होते. जानेवारीमध्ये शाळांची नोंदणीप्रक्रियाही पूर्ण झाली होती. यंदाच्या वर्षी मात्र, जानेवारी महिना संपत आलेले असतानादेखील शाळांची नोंदणीप्रक्रिया पूर्ण झालेली नाही.  अखेर शाळा नोंदणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. २३ जानेवारी २०२३ पासून यंदा शाळांची नोंदणी सुरू होणार आहे. शाळांच्या नोंदणी, गटशिक्षणाधिकारी स्तरावर पडताळणी केली जाईल. त्यामुळे सध्यातरी शाळांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत आरटीई प्रवेशासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकीकडे शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली असून, प्रवेशदेखील निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने बीडसह राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष प्रवेशाकडे लागले आहे.

तपासणीसाठी समिती; संस्था चालकांच्या मर्जीने समिती गठित करू नका :- मनोज जाधव

पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाल्यानंतर शाळेत प्रवेश घेता येणार आहे. तसेच शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. मात्र ही समितीत शिक्षण विभाग संस्था चालकांच्या मर्जीने गठीत करीत असून हे प्रतिनिधी प्रत्येक वर्षी बदलणे गरजेचे आहे. तसेच यात निस्वार्थपणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सामजिक कार्यकर्त्यांना स्थान दिले पाहिजे जेणेकरून आरटई प्रवेशात होणाऱ्या बोगसगिरीला आळा बसेल आणि खऱ्या गरजवंतांना आणि गोरगरिबांना आरटीई प्रवेशाच्या माध्यमातून चांगल्या शाळेत मोफत प्रवेश मिळेल. असे मत शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.

आरटीई प्रवेशाच्या अनुदानापोटी जिल्ह्यातील शाळांना अडीच कोटी रुपयांचा निधी वाटप

आरती अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशापोटी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या फी प्रतिपूर्तीचा भाग म्हणून २ कोटी ४७ लाख ५६ हजार अनुदान जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून शिक्षण विभागाने सन 
२०२० - २१ च्या फी परतावा जिल्ह्यातील १३९ शाळांना दिला यात ज्या शाळांचे आरटीई प्रवेशातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शंभर टक्के आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आले व बाकी उतरत्या क्रमाने निधी वाटप करण्यात आला या निधी वाटपामुळे शाळांना त्यांची रक्कम मिळाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आता सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशाला याने चांगला प्रतिसाद मिळेल.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी