डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, " इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. "
वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच, आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, " इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. "
अविनाश देशमुख शेवगांव
9960051755
कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला; तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.
बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.
वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक देणे / घेणे वादातून संपले,
पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला.
कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता, ह्याला मी किती मदत केली होती...
सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.
नाती बिघडली, सबंध बिघडले, वाट्याला एकटेपण आले, आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.
तरीपण एक नातं अजून टिकलं आहे, एक फोन चालु आहे, ते नातं मुलीचं.
तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते--- " पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झाल काय ?"
नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात उरतं...
थोडा पश्चातापही होत असतो , मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?
लोक मुलगा झाला कि, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते ,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होय.
एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवावे, यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. तेव्हा मुलगी म्हणते,
" बाबा काळजी करू नका मी आहे ना !!....
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Comments
Post a Comment