Posts

Showing posts from August, 2024

शहिद जवान लान्स नायक अजित वाल्हेकर यांच्या स्मृती दिना निमित्त पाटोद्यात सामाजिक उपक्रम घेऊन साजरा

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) शहिद जवान लान्स नायक अजित सुखदेव वाल्हेकर यांच्या 23 व्यां स्मृती दिना निमित्त विर एकलव्य आदिवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पाटोदा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला.पाटोदा तालुक्यातील जवान लान्स नायक अजित वाल्हेकर सेवा भावी संस्था पाटोदा यांच्या वतीने शहीद जवान अजित वाल्हेकर यांच्या स्मृति दिना त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक नय्युमभाई पठाण,सभापती किशोर अडगाळे,नगरसेवक हांनमत काळे,सुनील वाघमारे साहेब,खंडू जाधव,ढेरे साहेब, परमेश्वर गर्जे,शहादेव पवार, मारुती पवार, नवनाथ शिंदे, सागर तुपे,हजारे साहेब, आप्पा राऊत,अक्षय वीर, ऋषिकेश इंगोले, अजिंक्य जाधव, प्रशांत जाधव ,निखिल सरगर, विजय शिंदे, सुमित कुटे रोहन वीर, गणेश पाटोळे, सुजित अडगळे,ऋषिकेश वीर, विशाल घाडगे, सुरज मुळीक, यश चव्हाण विवेक गवळी, कृष्णा गवळी यांच्या सह आजी माजी सैनिक व वाल्हेकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

अबब ! घोळच- घोळ ; पत्रावर आवक/जावक नंबरच नाही

Image
अबब ! घोळच- घोळ ; पत्रावर आवक/जावक नंबरच नाही केजच्या बिडिओ तथा विस्तार अधिकाऱ्यानी सोडायला लावले आमरण उपोषण गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांच्या तसेच उपोषणकर्त्या समोर कर्मचाऱ्यांची दादागिरी   गट विकास अधिकारी हा पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून विविध विवरणपत्रे, हिशोब, अहवाल व त्याबाबतचे स्पष्टीकरण मागवितो. पंचायत समिती आणि राज्य शासन यामध्ये दुवा म्हणून गट विकास अधिकारी कार्य करतो. गट विकास अधिकारी पंचायत समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवतो. यासाठी वा इतर विकास कामानंसाठी गटविकास अधिकारी काम करतो मात्र केजच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने या केजचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे आठवड्यातील दोन दिवसानंसाठी अंबाजोगाईहुन येऊन केजचा कारभार पाहतात त्यामुळे म्हणावी ऐवढी वचक या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तथा अधिकाऱ्यांवर नसल्यामुळे रोजगार सेवक ते वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी आपल्या मनःमर्जीने वागत असल्याचे जनतेत बोलले जात आहे.  केज तालुक्यातील मौजे धनेगाव येथील मागासवर्गीय समाजातील रंजित महादेव सोनवणे, छत्रभुज पांडुरंग सोनवणे, खं

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका वतीन 12 ऑगस्टला स्थगित केले ले अन्नत्याग आमरण उपोषण गेवराई पंचायत समिती समोर आज दिनांक 31 ऑगस्टला सुरु करन्यात आले

Image
प्रतिनिधी - गेवराई आज दिनांक 31 ऑगस्टला स्थगित केले ले अन्नत्याग उपोषण करन्याची वेळ गेवराई पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी आनली असुन माध्यमाशी बोलताना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष काॅम्रेड सखाराम पोहीकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे असे सांगीतले की दिनांक 12 ऑगस्टला अन्नत्याग आमरण उपोषण करन्यात आले होते पंचायत समिती गेवराई गटविकास अधिकारी कांबळे मॅडम व विस्तार अधिकारी ऊनवने साहेब यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका कार्यकारणी यांच्या सोबत 12 ऑगस्टला अन्नत्याग उपोषण स्थगित करन्यासाठी प्रलंबित मागन्याची अमलबजावणी 30 ऑगस्ट पर्यंत करु म्हणून लेखी आश्वासन दिले व दिनांक 13/14/15 ऑगस्ट ध्वजारोहण असल्या मुळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या गैर हजरी मुळे गैर सोय होईल ध्वजारोहणाचे सर्व जवाबदारी ग्रामपंचायत कर्मचारी करतात म्हणून आज 12 ऑगस्टला अन्नत्याग आमरण उपोषण स्थगित करा व 30 ऑगस्ट पर्यंत मागन्या मंजुर करु ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुरक्षा किटा व 8.33% खात्यावर जमा करु ज्या ग्रामपंचायत च्या वसुल्या आहेत त्यांना

कृपया मोबाईल या राक्षसास आपल्या परिवारापासून लांब ठेवा,कमीतकमी लहान मुलांना तर खूप जपा

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 मी अंथरुणातून उठलो तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का ? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता. मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, "माझ्या छातीमध्ये आज रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखत आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो." “हो पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईलमध्ये बघता बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती. मी गाडीची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि गाडी स्टार्ट होत नव्हती. त्याच वेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, "काय साहेब, गाडी चालू होत नाही का?" मी म्हणालो, "नाही...!!” "साहेब, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. इतका घाम का येतो आहे? साहेब, या परिस्थितीमध्ये गाडीला किक मारू नका, मी किक मारून चालू करून देतो." ध्रुवने एकच किक मारून गाडी चालू करून दिली. त्याबरोबरच विचारले, " साहेब, एकटेच जात आहात का?" मी म्ह

चॉकलेट चोरीच्या संशयावरून ८ वर्षीय मुलास झाडाला दीड तास बांधून ठेवले

Image
केज तालुक्यातील घटना, महिला किराणा दुकानदारासह तिघांवर अॅट्रॉसिटी  बीड प्रतिनिधी - शाळा सुटल्यानंतर घराकडे निघालेल्या तिसरीच्या आठवर्षीय विद्यार्थ्यास किराणा दुकानदाराने चॉकलेट चोरल्याच्या संशयातून कपड्याने झाडाला दीड तास बांधून ठेवले. येवता (ता. केज) येथे ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. केज तालुक्यातील येवता येथे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा बाळू संतोष गायकवाड हा बालक २९ ऑगस्ट रोजी मधल्या सुटीत घरी येत होता. या बालकास गावातील एक किराणा दुकानदार कविता जोगदंड या महिलेने चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून घरासमोर असलेल्या प्राजक्ताच्या झाडाच्या खोडाला बांधले. त्यामुळे बालक घाबरून रडू लागले. या वेळी बालकाने पाण्याची मागणीही केली, मात्र महिलेने त्याला पाणी दिले नाही. दरम्यान, दुपारच्या सुटीत मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने मुलाचा शोध घेतला. त्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेमुळे मुलगा घाबरल्याने त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुलास बांधून का ठेवले, अशी विचारणा केली असता बालकाच्या आईला क

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

Image
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न; आनंदोत्सव शांतता पुर्वक संयमाने साजरा करण्याचे सपोनि.चंद्रकांत गोसावी यांचे आवाहन  लिंबागणेश:-( दि .३० ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दि.३० शुक्रवार रोजी सकाळी गणेशोत्सवासह येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मारोती मंदिरात नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी.चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. चंद्रकांत रोकडे यांना लिंबागणेश येथील गणेशोत्सव दरम्यान कारवयक्रमाची सविस्तर माहिती घेतली. ग्रामस्थांनी केलेल्या सुचनांचे पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.ध्वनीप्रदुषण बाबतीत काळजी घ्यावी,डिजे लावण्यास परवानगी नसुन कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा, महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. गावात होर्डिंग्ज लावण्यापूर्वी ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र मधील बीड जिल्ह्यातील विविध 13 मुद्द्यांवर देण्यात आले निवेदन

Image
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र मधील बीड जिल्ह्यातील विविध 13 मुद्द्यांवर निवेदन देण्यात आले. नितीन सोनवणे  बीड प्रतिनिधी :- डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण बीड, महात्मा फुले अंतर्गत NSFDC - 641 दाखल केलेल्या फाईलचा निधी लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा. व 162 कोटी अनुसूचित जातीचा वळवळेला निधी वापस देण्यात यावा. विशाल गड दंगलीतील दंगलखोरांना अटक झाली पाहिजे. नुकसान झालेल्या ग्रामसथांना त्यांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. आरोपींना UAPA ॲक्ट अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जिल्हा व तालुक्यातील भूमीहीनांना दलितांना तात्काळ जमीन द्यावी.  आजच्या तारखेपर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनीचे तात्काळ सातबारा देण्यात यावेत.  फिलोशिप स्वाधार घरकुल योजनेचा सामाजिक न्यायचा निधी इतरत्र वळवू नये फिलोशिप सरसकट द्यावी. बीड येथील श्रेयस सोलार श्रेयस कंट्रक्शन जीएस एजन्सी श्री पंडित मोहन जगताप आणि तात्यासाहेब मोहन जगताप यांनी शासनाच्या विविध योजनेमध्ये बोगस कामे करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याने सण 2018

परळी नगर परिषद कार्यलयातील अधिकारी कर्मचारी जुनी पेंशन लागूसह विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर

Image
नगर परिषद सर्व विभागातील कामकाज ठप्प, नागरिकांची गैरसौय  परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- जुनी पेशन योजना व इतर विविध मागण्यासाठी नगर परिषद /नगर पंचायत कर्मचारी यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. यासंपामध्ये परळी वैजनाथ येथील नगर परिषद कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच घोषणा देऊन शासनाचे निषेध व्यक्त केला जात आहे. जो पर्यंत आमच्या मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरु राहणार असल्याची प्रतिक्रिया संप कर्त्यांनी दिली आहे. संपावर कर्मचारी गेल्यामुळे नगर परिषद सर्व विभागातील कामकाज ठप्प होऊन नागरिकांची गैरसौय झाली होती.         राज्यातील सर्व नगर परिषद नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्याचे शासनाचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत होते. त्या कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत 2005 साली लागू झालेली dcps पेन्शन योजना आणि 2015 साली लागू झालेली NPS पेन्शन योजना प्रत्यक्षात लागू झालेली नाही. शासनाचे विविध विभाग नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारीच मानायला तयार नाही ही अत्यंत खेदाची बाब असून या विरोधात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग

महेश भारतीय यांचीवंचितच्या राज्य कार्यकारिणीत वर्णी

Image
महेश भारतीय यांची वंचितच्या राज्य कार्यकारिणीत वर्णी राज्यातील आंबेडकरवादी विद्यार्यांकडून निर्णयाचे स्वागत - अक्षय गोटेगावकर मुंबई -अविनाश भोसीकर, रमेश बारस्कर व महेश भारतीय यांची वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिघांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेले अविनाश भोसीकर आणि रमेश बारस्कर यांची उपस्थिती होती, तर महेश भारतीय यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. राज्यासह देशभरात विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांची महेश भारतीयांची मोठे जाळे आहे. अनेक विद्यार्थी प्रश्नांवर भारतीय यांनी टोकदार भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावलेले आहेत विद्यार्थ्यांच्या अडचणीवर तोडगा काढलेला आहे. नुकत्याच प्रदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करण्

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्तारोको; दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची शिवप्रेमींची मागणी

Image
बीड:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४३ फुट उंचीचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ८ महिन्याच्या कालावधीत कोसळला असुन यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन शिवरायांची अवमानना व निकृष्ट दर्जाचे काम करणारे शिल्पकार तथा मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीचे प्रोपरायटर जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील व संबंधित संस्थांना काळ्या यादीत टाकुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी शिवरायांचा दर्जेदार पुतळा उभारण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२९ गुरुवार रोजी सकाळी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गा वरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात शिवशक्ती भिमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, विक्की आप्पा वाणी,अशोकराजे वाणी, औदुंबर नाईकवाडे,करण वायभट, सचिन आगवान, अक्षय वाणी,अशोक थोरात,रामदास फाळके, हरिओम क्षीरसागर, महावीर वाणी, विवेक ब

राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती उत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -आसाराम सानप,करण तांदळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी) आपल्या प्रभावशाली वाणीतून समाज प्रबोधनाचे अलौकिक कार्य केलेले आधुनिक युगातील थोर समाज सुधारक,ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती पाटोद्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.राष्ट्रसंत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव 2024 कार्यक्रमाची रूपरेषा शुक्रवारी दिनांक 30/08/2024 रोजी संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन छत्रपती शिवाजी महाराज चौका ते संत भगवान बाबा चौका पर्यंत स्वराज्य ढोल ताशा पथक,केरळ वाद्य यांच्या सह अन्य पथक व Dj च्या गाण्यांवर टाळ मृदंगाच्या आवाजात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती निमित्त भव्य दिव्य मिरवणूक व संत भगवान बाबा जयंती उत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आसाराम सानप व करण तांदळे यांनी केले आहे

वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

Image
वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांच्या माध्यमातून यश मिळते, गणेश मुंडे बीड प्रतिनिधी     धारूर तालुक्यातील वसंतराव भागवत आश्रम शाळा सोनीमोहा येथील विद्यार्थी विद्यार्थिनी सातत्याने आपले कलागुण दाखवण्यासाठी विविध स्पर्धेमध्ये भाग घेत असतात , धारूर येथील राजमाता जिजाऊ कॉलेज या ठिकाणी क्रीडा विभागामार्फत घेणाऱ्या येणाऱ्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या ,या ठिकाणी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आले होत्या, यावेळी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये वसंतराव भागवत आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी बाजी मारली ,मध्ये वयोगट, , 17. मुले प्रथम आलेले विद्यार्थी, कृष्णा गणेश मुंडे, साठे बालासाहेब आप्पा,  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा वयोगट 14, प्रथम आलेल्या मुली, अश्विनी हनुमंत मुंडे प्रथम, धायतिडक राजकन्या प्रथम, स्वाती सदाशिव नाईकवाडे, प्रथम, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा वयोगट 17 मुली, प्रथम आलेले विद्यार्थीनी, वेदांती संदीप दराडे, आधी विद्यार्थी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य प्रलंबित मागण्याची अमलबजावणी होत नसल्याने 31 ऑगस्ट रोजी अन्नत्याग आमरण उपोषणाचा दिला ईशारा : क्रॉ . सखाराम पोहिकर . सय्यद जावेद . शरद मोरे

Image
 गेवराई (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दि . 12 / 8 / 2024 रोजी पंचायत समिती कार्यालया समोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते . यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम यांनी लेखी पत्र दिले होते व त्यापत्रामध्ये असा उल्लेख केला होता . की आपल्या मागण्या मी दि 30 ऑगस्ट पर्यंत सोडवीन व 8 % 33 टक्के भविष्य निर्वाह निधीचे ग्रामपंचायत कडील थकीत भरणा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर 30 ऑगस्ट पर्यंत जमा होईल व उर्वरित सात मागण्या पण 30 ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन आसे गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष क्रॉ . सखाराम पोहिकर हे आसे म्हणाले की जर माझ्या गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर 30 ऑगस्ट पर्यंत ग्रामपंचायत कडील आजपर्यंत चा थकीत रक्कम खात्यावर जमा नाही झाले तर मी गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह दि . 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 = 00 वाजता आपल्या कार्यालया समोर अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात करीन या शब

चौसाळा येथिल गुरूदत्त माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला व दहीहंडी कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा

Image
बीड जिल्हा (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौसाळा येथे संस्थेचे अध्यक्ष लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला व दहीहंडीच्या कार्यक्रमाचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले.. श्रीकृष्णाने बाळ गोपाळ व सवंगड्यांना घेऊन गोवर्धन पर्वत उचलला या एकीचं व संघटनेचे बळ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं . अशा सण-उत्सवामधून माझ्या शाळेतली मुलं संस्कारक्षम नागरिक व संस्कृतीचे पाईक घडतील अशी अपेक्षा डॉक्टर साहेबांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली . या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी (बाप्पा )शिंदे ,शालेय समिती सदस्य श्री संभाजी (आबा) जोगदंड ,श्री उमेश राव आंधळे ,चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक( बाबा) कुचेकर तसेच उमेश राव जोगदंड, घरत नाना , महेश रावजी कदम व प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. शाळेतील शिक्षक श्री राठोड सर, घोडके सर, मोठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलींनी गोपिकांच्या वेशामध्ये विविध गीतांवर टिपरी नृत्य केले . विद्यालयातील ले

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- मा.आ. भिमराव धोंडे

Image
आष्टी( प्रतिनिधी- गोरख मोरे ) :              दिनांक २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसरे कृषी प्रदर्शन आष्टी येथे होत असून , चार दिवस चालणारे कृषी प्रदर्शन म्हणजे बीड/धाराशिव /अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी असुन , याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले .    याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की , आष्टी येथील श्री. छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आयोजित चार दिवसीय भव्यदिव्य अशा कृषी प्रदर्शनाची संपूर्ण तयारी झालेली असुन , गुरुवारी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे व लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी, आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे . या प्रसंगी आष्टी तालुक्यातील विविध पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबासाहेब पिसोरे, बबनराव झांबरे, विजयाताई घुले यांच्यासह आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून , कृषी प्रदर्शनाम

आष्टी येथील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - डॉ हरिदास शेलार

Image
पाटोदा (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे नेते मा.आ.भिमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वात मोठे आष्टी तालुक्यात दुसऱ्यांदा कृषी प्रदर्शन संपन्न होत आहे.यामध्ये भारतातील सर्वात उंच ५१ लाखाचा सोन्या नावाचा कोसा बैल प्रमुख आकर्षण असणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींसाठी उद्धव के.पी‌. प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा, शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला,नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील.यासह बरेच काही असणार आहे. शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासह जिल्ह्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गाने,कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ हरिदास शेलार यांनी केले आहे.आष्टी शहरात मा.आ.भिमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वात मोठे राज्य स्तरीय कृषी प्रदर्शन दि .२९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पंडित जवाहरलाल

मुळुकवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांकडुन बाथरूम स्वच्छता धक्कादायक प्रकाराची शिक्षण विभागाकडून दखल; विस्तार अधिका-यांची शाळेला भेट :- डॉ.गणेश ढवळे

Image
  लिंबागणेश :- बीड तालुक्यातील मुळुकवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांकडुन बाथरूम स्वच्छता करायला लावत असल्याचा व्हिडिओ काल दि.२८ मंगळवार रोजी एका ग्रामस्थाने काढून सोशल मिडीयावर अपलोड केला होता. याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून या धक्कादायक प्रकाराची दखल घेत आज दि.२९ बुधवार रोजी सकाळी शिक्षणाधिकारी यांच्या सुचनेवरून विस्तार अधिकारी मधुकर तोडकर, केंद्र प्रमुख आबासाहेब हांगे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.तसेच शाळेतील पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल वरीष्ठांना सादर करणार असल्याचे सांगत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडु नये याची दक्षता घेण्याची सुचना केली. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असुन ५२ विद्यार्थी पटसंख्या असुन दोन शिक्षक कार्यरत आहेत.परंतु एक पद रिक्त असल्याने तात्पुरती सोय म्हणून नागोबा शिक्षक केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काल दि.२८ रोजी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे बाथरूम स्वच्छ करायला लावले. गावातील काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा

लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताह संपन्न

Image
लिंबागणेश:- ( दि.२८ )बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सव निमित्त मोठ्या उत्साहात संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह (दशम स्कंध) आयोजन करण्यात आले होते. सप्ताह कालावधीत सकाळी पारायण,उटी उपहार, सायंकाळी आरती, प्रवचन आणि रात्री भागवत कथा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती.सप्ताहाची सांगता काल दि.२७ आगस्ट मंगळवार रोजी कथा प्रवाचक भागवताचार्य किर्तनकार गिरीशराज शास्त्री महानुभव यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.यावेळी पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेस्कर, महंत विश्वनाथ बाबा तसेच पंचक्रोशीतील महानुभव भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भजनी मंडळी पांडुरंग वाणी, बाजीराव दशमे,शिवहारी कोटुळे, विनायक मोरे, बाबुराव वाणी यांनी रंगत आणली.सांगता समारंभात आ.संदिप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर, रामकृष्ण बांगर यांनी भेट दिली. काल्याच्या किर्तनानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सविस्तर माहितीस्तव  ----- लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात सार्वजनिक श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त दि.२०.०८.ते.२७.०८ दरम्यान संगीतमय श्रीमद् भाग

संप तात्पुरता स्थगित कर्मचारी संघटना संपावर ठाम - बाबा बडे, बळीराम उबाळे

Image
बीड प्रतिनिधी :- बीड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा बडे जि प कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे तलाठी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर राख उपाध्यक्ष एस पी जगताप कळसकर सर निमंत्रक राजकुमार कदम सचिव हरिश्चंद्र ठोसर अध्यक्ष शीलाताई मुंडे प्रवक्ते डीजी तांदळे सर सचिव नंदकिशोर परळकर कार्याध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिनांक 26/08/2024 तहसील कार्यालय माजलगाव धारूर वडवणी व दिनांक 27/08/2024 रोजी पंचायत समिती अंबाजोगाई परळी केज वैद्यकीय महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ येथील प्रत्येक कार्याला जाऊन जुनी पेन्शन व राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना व इतर मागण्यासाठी 29/08/2024 च्या बेमुदत संपाबाबत प्रत्येक तालुका अध्यक्ष सचिव सर्वप्रमुखांच्या भावना जाणून घेतल्या व स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज परिचर संघटनाशी प्रत्यक्ष भेट घेऊन संपा बाबत सर्वांना मार्गदर्शन केले प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मिळण्याबाबत च्या भावना अतिशय तीव्र होत्या प्रत्येकाने सांगितलं की पेन्शनचा आदेश मिळाल्याशिवाय संप मागे घेऊ नका कारण सरकार पेन्शन बाबत सतत चालढकल करीत आहे त्यामुळे राज्य मध्यवर्ती संघटना व जिल्हा प

आमदार भिमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - गणेश शेवाळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे नेते मा.आ.भिमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वात मोठे आष्टी तालुक्यात दुसऱ्यांदा कृषी प्रदर्शन संपन्न होत आहे.यामध्ये भारतातील सर्वात उंच ५१ लाखाचा सोन्या नावाचा कोसा बैल प्रमुख आकर्षण असणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींसाठी उद्धव के.पी‌. प्रस्तूत महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा, शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत पारंपारीक लोकगीते, लोककला,नाटक, शास्त्रीय संगीत, शेतकरी गीते, लोकनृत्य यांचे सादरीकरण करण्यात येतील.यासह बरेच काही असणार आहे. शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासह जिल्ह्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गाने,कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गणेश शेवाळे यांनी केले आहे.आष्टी शहरात मा.आ.भिमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यातील सर्वात मोठे राज्य स्तरीय कृषी प्रदर्शन दि .२९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पंडित जवाहरलाल नेह

बीड शहर बचाव मंच,चे न.प. सि.ओ.निता अंधारे हटाव ची जिल्हाधिकारी कडे मागणी

Image
   बीड प्रतिनिधी - बीड शहर बचाव मंच, न.प, सि.ओ.निता अंधारे हटाव यांची मागणी बीड नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तात्काळ बदली करा बीड शहर बचाव मंचाचा गंभीर इशारा नितीन जायभाये, सीपीआय जिल्हा सचिव भाऊराव प्रभाळे, बीड शहर काँग्रेस अध्यक्ष ,  परवेज भाई कुरेशी, आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष अशोकदादा येडे, समाजसेवक फैयाज भाई सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य सचिव मीनाक्षीताई देवकते, अमजदभाई कुरेशी, अशोक वाघमारे, नानाभाऊ लव्हारे आधी शिष्टमंडळात उपस्थित होते. मुख्याधिकारी यांनी केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करा व यांची तात्काळ बदली करण्यात यावी. बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे गेल्या अनेक महिन्यापासून बीड शहरातील सर्वच भागांना 25 दिवसांना एकदा पाणी दिले जाते. 365 दिवसांची नळपट्टी,पाणीपट्टी आकारली जाते . यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरलेला आहे.  पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच आंदोलन करून ,उपोषणही केलेले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे पूर्ण नियोजन कोलमडलेले आहे. वीज महावित

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानवतकर

Image
 छ.संभाजीनगर/प्रतिनिधी      "सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!" हे तथागताच्या विचारातून आणि त्यांच्या नंतर सर्वच महापुरुषांच्या कार्यातून,विचारातून आलेले संपूर्ण मानवजातीचे हित, 'हाच खरा मानवतावाद आहे; मात्र त्यांच्या विचारातला आणि कृतीतला मानवतावाद आम्ही चिकित्सकपणे समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.        साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त २५ ऑगस्ट रोजी, दुपारी १ वाजता, छ.संभाजीनगर येथील नागसेनवन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'लॉ 'कॉलेजच्या महात्मा फुले सभागृहात "मानव प्रतिष्ठा-सृजनता साहित्य परिषद,महाराष्ट्र "च्या वतीने 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते. उद्घाटकीय भाषणात डॉ.धोंडोपंत मानवतकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या आयुष्यात कोणतीच परिस्थिती पुरक नसताना त्यांनी अहोरात्र संघर्ष करत सामाजिक परिवर्तनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, यातून वेळ काढून वास्तव परिस्थितीवर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटके,

शेवगांव डेपोच्या एस. टी. बस णे प्रवास राम भरोसे

Image
शेवगांव डेपोच्या एस. टी. बस णे प्रवास राम भरोसे  एस टी बसच्या मागील दोन चाके बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले शेवगांव आगाराच्या नगरहून मिरी मार्गे शेवगावकडे येणाऱ्या एस.टी. बसची मागील दोन चाके अचानक बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले. { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 या बाबत सविस्तर वृत्त असे की पाठीमागील दोन चाके बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले आगाराच्या अहमदनगरहून मिरीमार्ग शेवगावकडे येणाऱ्या एसटी बसची पाठीमागील दोन चाके अचानक बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले. रस्त्यावरील नागरिकांच्या व इतर प्रवाशांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करुन चालकाच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवली. मात्र या घटनेमुळे एका मोठया अपघातातून प्रवाशांची सुटका झाली असली तरी महामंडळाच्या गाडयांचा व प्रवाशांच्या सुरक्षितते चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेवगाव आगारची अहमदनगरहून मिरीमार्गे शेवगावकडे येणारी बस शनिवार (दि. २४) रोजी दुपारी ४ च्या सुमारास निंबेनांदुर येथे आली. तेथील प्रवाशी उत

हिवरसिंगा मधील रेल्वेवळण रस्त्याच्या पूलाखालील पाण्याचा निचरा करावा-शिवराम राऊत

Image
(शिरूर प्रतिनिधी ) हिवरसिंगा सह मलकाचीवाडी गावातील नागरिक,शेतकरी,विद्यार्थी यांना जाण्यासाठीच्या एकमेव मार्गातील रेल्वेवळणरस्त्याच्या पुलाखालचे साचलेले पाणी निचरा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांची शिवराम राऊत,रामेश्वर पांडुळे यांनी भेट घेऊन व्यथा सांगीतल्या. नगर ते परळी रेल्वेमार्गातील मौ.हिवरसिंगा ता.शिरूर का.जि.बीड येथून मलकाचीवाडी मार्ग जाणा-या जवळागीरी राज्य मार्गातील पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे अनेक वर्षापासुन प्रत्येक पावसाळ्यातील या पुलाखाली किमान४/५ फुट पाणी साचून हिवरसिंगा सानप वस्ती,उतारा वस्ती, दुधाळ वस्ती,चव्हाण वस्ती,सालपे वस्ती, हनुमान नगर,रोकडेश्वर नगर ,मौ.मलकाची वाडी यांना जाण्या-येण्यासाठी अंत्यंत महत्वाचा व एकमेव रस्ता आहे.जोपर्यंत रेल्वे रूळ नव्हते तो पर्यंत वरील रस्त्याने रहदारी होती परंतू सद्यस्थितीत रेल्वे रूळ आसल्याने सदरिल पुलाखालुनच मार्ग आसल्याने या ठिकाणचे नागरिक शेतकरी,विद्यार्थी, रुग्ण यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते.करिता या विषयी शिरुर तहसिलदार,रेल्वे उपविभाग नगर यांना अनेकवेळा विनंती करूनही साचलेल्या पाण्यावर ठोस उपाययो

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटना आम आदमी पार्टी च्या वतीने जाहीर निषेध

Image
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटना आम आदमी पार्टी च्या वतीने जाहीर निषेध  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, ढासळल्याची पण घ्यावी-माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी  बीड प्रतिनिधी :- आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने नोंदवण्यात येत आहे की महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवत आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कुलदैवत मानले जाते त्या महाराजांचा फक्त आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोसळतो आणि तोही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातसे त्याचे लोकार्पण होते आणि तो पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळतो या पेक्षा मोठा दुर्दैव या देशांमध्ये होऊ शकत नाही तर माननीय पंतप्रधान यांनी लोकार्पण करण्याची वा वाई घेतली तर आता पुतळा ढासळला याची देखील जिम्मेदारी घ्यावी या भयानक गोष्टीची कसून चौकशी झाली पाहिजे आणि या देशांमध्ये किती खालच्या दर्जापर्यंत निकृष्ट काम करण्याची वृत्ती आणि भ्रष्टाचाराचे

शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे शालेय विद्यार्थीनींची " निषेध रॅली"

Image
लिंबागणेश:- ( दि.२७) देशात आणि राज्यात महिलांवरील, विद्यार्थीनी व युवतींवर अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असुन सद्यस्थितीत सर्वच स्तरांतील महिला सुरक्षित नसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या गंभीर प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बदलापुर व अन्यत्र अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दि.२७ मंगळवार रोजी "निषेध रॅली" काढण्यात आली.अत्याचाराच्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे महिलांवरील अत्याचार बंद करा, अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.महिलांना संरक्षण द्या " लेक वाचवा देश वाचवा" " बदलापूर चिमुकल्यांना न्याय द्या "या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनींनी हातात धरलेल्या मागण्यांच्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मारोती मंदिर, ढवळे चौक,सरकारी वाडा, श्रीकृष्ण मंदिर आदी ‌गावातील प्रमुख चौकातुन "निषेध रॅली" काढण्यात आली. बदलापूर, कोलकत्ता सह अन्य महिला अत्याचार प्रकरणा

अमोलजी सुतार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे (गट ) शिवसेना गेवराई तालुका उपप्रमुखपदी निवड

Image
गेवराई (प्रतिनिधी )गेवराई शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण कार्यकर्ते मातंग समाजातील हा कोहिनूर हिरा माजी मंत्री बदामराव पंडित यांचे खंदे समर्थक तरुण तडफदार अमोल मधुकर राव सुतार यांची गेवराई तालुका उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर त्यांचे गेवराई शहरातील तरुणांनी जंगी स्वागत केले आहे उपप्रमुख पदी निवड होताच त्यांनी बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात शिवसेनेचे मोठे जाळे निर्माण करून आगामी विधानसभेत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे अमोलजी सुतार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले यावेळी माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गेवराई तालुका उपप्रमुख म्हणून अमोल सुतार यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे अमोलजी सुतार गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक वेळा परिश्रम घेतले गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या कामाची दखल घेऊन बदामराव पंडि

परळी ते बीड बसवाहक महिला कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत उद्धटपणा, बेशिस्त वर्तन

Image
बसमधील प्रवाशानी प्रश्न विचारले म्हणून चालू प्रवासातील बस 20 मिनिटे थांबवून ठेवली   परळी प्रतिनिधी - परळी ते बीड लालपरी प्रवसात करत असताना प्रवाशासोबत घडलेला हा धक्कादायक , प्रकार आहे, पांगरी ता.परळी येथील पर्यायी नळकांडी पुल वाणनदीला आलेल्या पुरानी चार दिवसा पूर्वीच वाहून गेला आहे. महामंडळाने गेल्या चार दिवसापासून या महामार्गावर बस सेवा वळवली आहे,परंतु रोड निश्चित न केल्याने याचा नाहाक त्रास बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे.परळी ते सोनपेठ, सोनपेठ ते शिरसाळा त्यानंतर बीड थेट बीडचे तिकीट मिळत नाही. तात्काळ रूट निश्चित करून थेट परळी ते बीड जाणाऱ्या प्रवासात तिकीट देण्याची व्यवस्था करावी. यामुळे प्रवास करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त भाड्याचा त्रास करावे लागत आहे. यावर आजच आपण निर्णय घ्यावा अन्यथा आपली व आपल्या उद्धट वाहक व चालक यांची तक्रार आपल्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहे. परळी बस स्थानकाचे डेपो मॅनेजर यांना अनेक वेळा बस मधून फोन केला त्यांनी तो फोन उचलला नाही. परळी ते बीड बस मध्ये प्रवास करत करताना हा सर्व प्रकार घडला . सदरील परळी डेपो ची बसचा क्रमांक

महीलांवर होणार्या आत्याचाराविरुद्ध भव्य“ महिला स्वराज्य यात्रा”

Image
महीलांवर होणार्या आत्याचाराविरुद्ध भव्य“ महिला स्वराज्य यात्रा” आम्हाला हव.. पुण्हा छत्रपतीशासन.. पुण्हा एकदा स्वराज्य. महाराष्ट्रात पुण्हा छत्रपतींच स्वराज्य नांदाव,महीलांसाठी सुरक्षीत महाराष्ट्र घडावा यासाठी नाशीक मघील प्रत्यक जाग्रुत नागरीकाने सामाजीक कार्यकर्त्यांनी आपल्या आई ,बहीन , पत्नीचा सुरक्षतेसाठी महिला स्वराज्य यात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी स्वराज्य महीला यात्रेच फलक घेऊन पुढे महीला व त्या पाठोपाठ मुली ५०० किलोची बुलट घेऊन दिसल्या .. भारताचा तिरंगा , छत्रपती शिवरायांचा भगवा त्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य पुण्हा येऊद्या .. नाराधमाला फाशी द्या .. स्त्री सुरक्षीत तर देश सुरक्षीत अशा घोषनांनी संपुर्ण नाशीक दुमदुमल होत..  यावेळी स्वराच्य जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांनी युनायटेड वी स्टेंड व सकल मराठा समाजाचे आभार मानले तसेच सर्वानमते काही ठराव मांडले. स्त्री शक्ती साठी अनेक मुलांनी भावणीक भाषण केले अक्षता देशपांडे , पुजा ताजनपुरे , त्रीशा राजपुत , रेखा जाधव,काजय सांगळे , भाग्यश्री पवार , लवीना थेवर यांचा मणोगता नंतर सर्वांच्या डोळ्यात आश्रु दिसुन आले . य

पुसरा गावच्या रस्ता आणि पुलाचा प्रश्न मिटवा नाहीतर आंदोलन करू-सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे

Image
गेल्या अनेक वर्षांपासून पुसरा, तिगाव, चिंचाळा आणि इतर अनेक गावाला जोडणारा मुख्य पुसरा फाट्यापासून सुरू होणारा रस्ता,नदीवरील पूल यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. गावातील तरुणांनी, युवकांनी अनेक आंदोलने,निवेदने देऊनही या कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आजी,माजी,भावी,आमदार,जिल्हा परिषद सदस्य यांनीही पहिल्यापासून पुसरा गावाच्या मूलभूत समस्या कडे दुर्लक्ष केले आहे.. पुसरा गावापासून एक किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडत पडलेला आहे.खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही या खिळखिळ झालेल्या रस्त्याचा नागरिकांना दळणवळणासाठी त्रास होत आहे.. ! पुसरा गावच्या रस्त्यांकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन रस्ता आणि नदीवरील पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा गावकऱ्याना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा,गावकऱ्यांच्या वतीने पुसरा येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे .. 

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत वर बिराड मोर्चा

Image
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत वर बिराड मोर्चा :- नितीन सोनवणे  100 रमाई घरकुलाचे प्रलंबित पहिला हप्ता तात्काळ द्या. दोन महिन्यांपासून यादी लागलेली असून मंजूर झालेल्या शंभर रमाई घरकुलाचे पाटोदा येथील चेक देण्यात यावेत भर पावसात दलितांचे घरे उघड्यावर आहेत चेकला उशीर झाला म्हणून दलित समाजात संताप आहे मानसिक तणावात आहेत आजही स्वतंत्र भारतात आमची व्यवस्था बिकट आहे मंजूर चेक वाटप न करणे हा जातीवाद आहे ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे येणाऱ्या चार दिवसात चेक वाटप न झाल्यास शिवाजी चौक ते नगर पंचायत पाटोदा दलितांचा बिराड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार करतील राज्याचा मुद्दा केल्याशिवाय शांत बसणार नाही उघड्यावर कुटुंब राहत आहेत पावसात त्यांच्या जिवितास काही झाल्यास नगरपंचायत जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन आज मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांना ऑल इंडिया पॅंथर सेना च्या वतीने देण्यात आले, नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष, बापू जावळे तालुका अध्यक्ष, ऋषिकेश जावळे, आशिष जावळे, नितीन

अल्पसंख्याक समाजातील गुणवंत गुरुजनांचे 5 सप्टेंबर शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण - शेख आयेशा

Image
बीड प्रतिनिधी   दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुस्लिम समाजातील गुणवंत शिक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. आदर्श मुस्लिम शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र गुणवंत शिक्षकानी मोबाईल 70 30 14 93 22 या नंबर वर नोंद करावी, असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे.  5 सप्टेंबर हा दिवस आदर्श शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मात्र आज पर्यंत मुस्लिम समाजातील गुणवंत आणि आदर्श असलेल्या गुरुजनांची विशेष दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. हे वास्तव लक्षात घेऊन अल्पसंख्यांक समाजातील जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपले आयुष्य झिजवतात मात्र शासन दप्तरी आणि विविध संस्थेच्या वतीने खाजगी स्वरूपात ज्यांना आदर्श शिक्षक म्हणून गुण गौरवले जात नाही अशा गुणवंत शिक्षकांचा शिक्षक दिनी आश्रय सेवा केंद्राच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. आश्रय सेवा केंद्राने यावर्षीपासून यापुढे दरवर्षी शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज

आदर्श मैत्री फाऊंडेशन व अंबाजोगाई दर्शनकडून गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धांचे आयोजन

Image
आदर्श मैत्री फाऊंडेशन व अंबाजोगाई दर्शनकडून गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धांचे आयोजन जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती व संपादक सतीश मोरे यांची माहिती अंबाजोगाई (प्रतिनिधी ) येथील आपल्या मातीचे भूषण ठरलेले अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल हे केबल टीव्ही बरोबरच सोशल मिडियात लाखो दर्शकांचे नंबर वन पसंतीचे चॅनल झाले आहे. अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलमधून चालू घडामोडींचा ताजा आलेख सातत्याने प्रसारण केले जाते. 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाऊंडेशन आणि अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात विशेषांक प्रकाशन सोहळा, गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई च्या वतीने आकर्षित बक्षीस व रोग पारितोषिक देण्यात येणार असून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नांवनोंदणी सुरू असल्याची माहिती आदर्श मैत्री फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती व अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलचे सं

संत सावता गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप नाईकनवरे तर उपध्यक्षपदी सांगळे, शेवाळे यांची निवड

Image
 पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील मानाच्या गणेश मंडळा पैकी एक व अनेक वर्षी नंबर एकचे पारितोषक मिळवणाऱ्या श्री संत सावता गणेश मंडळाची बैठक संत सावता महाराज मंदीर माळेगल्ली पाटोदा येथे संपन्न झाली दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी श्री संत सावता महाराज गणेश मंडळाची बैठक झाली यावर्षीच्या संत सावता गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदी संदीप नाईकनवरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र सांगळे, राहुल शेवाळे तर सचिव पदी भागवत नाईकनवरे यांची एकमताने निवड झाली तसेच सहसचिव पदी विशाल नाईकनवरे व कोषाध्यक्ष ओम गोरे यांची निवड करण्यात आली यावेळी संत सावता माळी गणेश मंडळाचे मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते