पुसरा गावच्या रस्ता आणि पुलाचा प्रश्न मिटवा नाहीतर आंदोलन करू-सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे


गेल्या अनेक वर्षांपासून पुसरा, तिगाव, चिंचाळा आणि इतर अनेक गावाला जोडणारा मुख्य पुसरा फाट्यापासून सुरू होणारा रस्ता,नदीवरील पूल यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. गावातील तरुणांनी, युवकांनी अनेक आंदोलने,निवेदने देऊनही या कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आजी,माजी,भावी,आमदार,जिल्हा परिषद सदस्य यांनीही पहिल्यापासून पुसरा गावाच्या मूलभूत समस्या कडे दुर्लक्ष केले आहे.. पुसरा गावापासून एक किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडत पडलेला आहे.खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही या खिळखिळ झालेल्या रस्त्याचा नागरिकांना दळणवळणासाठी त्रास होत आहे.. ! पुसरा गावच्या रस्त्यांकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन रस्ता आणि नदीवरील पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा गावकऱ्याना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा,गावकऱ्यांच्या वतीने पुसरा येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णूबाळ झोडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे .. 

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !