चौसाळा येथिल गुरूदत्त माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला व दहीहंडी कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा


बीड जिल्हा (प्रतिनिधी-- गोरख मोरे )
          गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौसाळा येथे संस्थेचे अध्यक्ष लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला व दहीहंडीच्या कार्यक्रमाचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले.. श्रीकृष्णाने बाळ गोपाळ व सवंगड्यांना घेऊन गोवर्धन पर्वत उचलला या एकीचं व संघटनेचे बळ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं . अशा सण-उत्सवामधून माझ्या शाळेतली मुलं संस्कारक्षम नागरिक व संस्कृतीचे पाईक घडतील अशी अपेक्षा डॉक्टर साहेबांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली . या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी (बाप्पा )शिंदे ,शालेय समिती सदस्य श्री संभाजी (आबा) जोगदंड ,श्री उमेश राव आंधळे ,चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक( बाबा) कुचेकर तसेच उमेश राव जोगदंड, घरत नाना , महेश रावजी कदम व प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. शाळेतील शिक्षक श्री राठोड सर, घोडके सर, मोठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलींनी गोपिकांच्या वेशामध्ये विविध गीतांवर टिपरी नृत्य केले . विद्यालयातील लेझीम पथकाने श्री केदार सर व साबणे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून पथकाचे कौशल्य दाखवलं . प्राथमिक गटातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या गोविंदा पथकाने श्री गुरव सर व लिमकर सर यांच्या प्रेरणेतून दहीहंडी फोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला . माध्यमिक गटातील आठवी ते दहावी वर्गातील गोविंदा पथकाने श्री वैद्य सर व बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी फोडण्यात यश मिळवले . शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीमंत चौधरी सर यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहकारी श्रीमती टाच तोडे , संजय सोनवणे, धनंजय वाघमारे, विश्वनाथ पवार यांनी मोलाचे परिश्रम घेतले .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !