मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्तारोको; दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची शिवप्रेमींची मागणी


बीड:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ४३ फुट उंचीचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ८ महिन्याच्या कालावधीत कोसळला असुन यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन शिवरायांची अवमानना व निकृष्ट दर्जाचे काम करणारे शिल्पकार तथा मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीचे प्रोपरायटर जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील व संबंधित संस्थांना काळ्या यादीत टाकुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी शिवरायांचा दर्जेदार पुतळा उभारण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२९ गुरुवार रोजी सकाळी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गा वरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात शिवशक्ती भिमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, विक्की आप्पा वाणी,अशोकराजे वाणी, औदुंबर नाईकवाडे,करण वायभट, सचिन आगवान, अक्षय वाणी,अशोक थोरात,रामदास फाळके, हरिओम क्षीरसागर, महावीर वाणी, विवेक बागल, गहिनीनाथ वाणी, नाना वाणी,अजिम शेख, विलास काटे,अभिजित गायकवाड,सुरेश निर्मळ,शहादेव धलपे, विनोद चौरे, संतोष वाणी,भरत वाणी, आण्णा जाधव, दगडु ढवळे , कृष्णा पितळे, गजानन रंदवे, भास्कर ढास, महावीर वाणी, पिंपरनई सरपंच बाळासाहेब वायभट, कृष्णा वायभट,रवी वायभट, रेवण येडे, बळीराम येडे, विशाल येडे, नितीन येडे, दत्ता जाधव, कमलाकर काटवटे,खदीर पठाण, गणेश कागदे ,अक्षय कुदळे,वरद जोशी ,चेतन कानिटकर, महेश ढवळे, बळीराम येडे आदि सहभागी होते.

सविस्तर माहितीस्तव 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट येथील किल्यावर नौदल दिनानिमित्त दि.४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ( चबुतरा बांधकाम १५ फुट आणि त्यावर २८ फुट पुतळा) एकुण ४३ फुट उंचीच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, तत्कालीन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत झाले होते.पुतळा सुशोभीकरण आणि इतर व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाने सुमारे ५ कोटी रुपये खर्च केले होते. 
मालवण मधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० आगस्ट २०२४ रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याच्या नट बोल्ट यांनी गंज पकडला असुन पुतळा विद्रुप दिसत आहे.तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगुन कायमस्वरूपी उपाययोजना तात्काळ करण्यात यावी असे कळविले होते मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
दि.२६ आगस्ट २०२४ रोजी हा पुर्णाकृती पुतळा कोसळुन पडल्याची धक्कादायक घटना घटली असुन निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळला असुन यामध्ये शिवरायांचा अवमान झाला असुन याबद्दल शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन तिव्र संतापाची भावना असुन जयदीप आपटे शिल्पकार तथा मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीचे प्रोपरायटर आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या संस्थांना काळ्या यादीत टाकुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्जेदार पुतळा दिमाखाने उभारण्यात यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले यांनी पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा कोसळला,मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला हा पुतळा बदलावा म्हणून पंतप्रधान यांच्याकडे दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच स्थानिक लोकांनी पुतळ्याच्या निकृष्ट कामाबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असुन सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !