ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य प्रलंबित मागण्याची अमलबजावणी होत नसल्याने 31 ऑगस्ट रोजी अन्नत्याग आमरण उपोषणाचा दिला ईशारा : क्रॉ . सखाराम पोहिकर . सय्यद जावेद . शरद मोरे



 गेवराई (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दि . 12 / 8 / 2024 रोजी पंचायत समिती कार्यालया समोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते . यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम यांनी लेखी पत्र दिले होते व त्यापत्रामध्ये असा उल्लेख केला होता . की आपल्या मागण्या मी दि 30 ऑगस्ट पर्यंत सोडवीन व 8 % 33 टक्के भविष्य निर्वाह निधीचे ग्रामपंचायत कडील थकीत भरणा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर 30 ऑगस्ट पर्यंत जमा होईल व उर्वरित सात मागण्या पण 30 ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन आसे गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष क्रॉ . सखाराम पोहिकर हे आसे म्हणाले की जर माझ्या गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर 30 ऑगस्ट पर्यंत ग्रामपंचायत कडील आजपर्यंत चा थकीत रक्कम खात्यावर जमा नाही झाले तर मी गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह दि . 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 = 00 वाजता आपल्या कार्यालया समोर अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात करीन या शब्दावर मी या अन्नत्याग आमरण उपोषणाला स्थगिती देत आहे तेव्हा आजपर्यंत आमच्या मागण्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही तेव्हा दि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 = 00 वाजता ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष क्रॉ . सखाराम पोहिकर . तालुका उपाध्यक्ष क्रॉ . शरद मोरे . तालुका सचिव सय्यद जावेद क्रॉ . उद्धव वडमारे . क्रॉ . बाबासाहेब राठोड . क्रॉ शेख याशीनभाई . क्रॉ . प्रल्हाद नागरगोजे . क्रॉ . सुरेश दरेकर . क्रॉ . अरुण आठवले . क्रॉ . तिर्थराज भालेकर . क्रॉ . गणेश कुटे . क्रॉ . उद्धव शिदे . क्रॉ सातिराम गव्हाणे . क्रॉ सुदाम मासाळ . क्रॉ विनोद वाघ या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्या समोर गटविकास अधिकारी यांनी आपण आपले अन्नत्याग आमरण उपोषण मागे घेणे हि विनंती पत्र देऊन या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की आपल्या सर्व मागण्या संदर्भात 1 ते 7 बाबद ग्रामसेवक सरपंच यांना पत्र देऊन आपल्या मागण्यानुसार तात्काळ पुर्तता करणे बाबद कळविले आहे तसेच वेळोवेळी ग्रामपंचायत बैठकीमध्ये सुचना दिलेल्या आहेत काही ग्रामपंचायतने या बाबद पूर्तता केली आहे उर्वरीत 100 % टक्के ग्रा प ला आपल्या मागण्या बाबद येत्या 15 दिवसात पुर्तता करणे बाबद कळविण्यात आले आहे तरी आपण आपले आज दि . 12 / 8 / 2024 पासून पंचायत समिती कार्यालय गेवराई या ठिकाणी चालू आसलेले अन्नत्याग आमरण उपोषणाला स्थगिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे 8 % 33 टक्के भविष्य निर्वाह निधी चा भरणा दि 30 / 8 / 20 24 पर्यंत करणे बाबद सर्व ग्राम सेवक यांना सुचना देण्यात आल्या आहेत तरी या पत्राची आतापर्यंत अमलंबजावणी होत नाही आसे दिसून येत आहे तेव्हा आता पुन्हा आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी दि 31 / 8 / 20 24 पासून सकाळी 11 = 00 वाजता पंचायत समिती कार्यालया समोर अन्नत्याग अमरण उपोषणाला सुरूवात करत आहोत असे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष क्रॉ सखाराम पोहिकर यांनी प्रशिद्धीप्रत्रकाद्वारे जाहीर केले आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !