अल्पसंख्याक समाजातील गुणवंत गुरुजनांचे 5 सप्टेंबर शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण - शेख आयेशा


बीड प्रतिनिधी 
दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुस्लिम समाजातील गुणवंत शिक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. आदर्श मुस्लिम शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र गुणवंत शिक्षकानी मोबाईल 70 30 14 93 22 या नंबर वर नोंद करावी, असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे. 
5 सप्टेंबर हा दिवस आदर्श शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मात्र आज पर्यंत मुस्लिम समाजातील गुणवंत आणि आदर्श असलेल्या गुरुजनांची विशेष दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. हे वास्तव लक्षात घेऊन अल्पसंख्यांक समाजातील जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपले आयुष्य झिजवतात मात्र शासन दप्तरी आणि विविध संस्थेच्या वतीने खाजगी स्वरूपात ज्यांना आदर्श शिक्षक म्हणून गुण गौरवले जात नाही अशा गुणवंत शिक्षकांचा शिक्षक दिनी आश्रय सेवा केंद्राच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. आश्रय सेवा केंद्राने यावर्षीपासून यापुढे दरवर्षी शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजातील शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून प्रशासनातील मान्यवर अधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.या पुरस्कारासाठी पात्र असलेल्या खऱ्या गुणवंत शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कार्याची, सामाजिक कार्याची माहिती तसेच आपला संपूर्ण परिचय हा 30 ऑगस्ट पर्यंत आश्रय सेवा केंद्र, सम्राट चौक, शाहूनगर कॉर्नर,बीड या ठिकाणी प्रत्यक्ष आणून सादर करावा किंवा मोबाईल नंबर वर पाठवावा. आपली पुरस्कारासाठी थोडक्यात माहिती ही व्हाट्सअप नंबर 70 30 14 93 22 या नंबरवर पाठवावी असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने पत्रकार शेख आयेशा यांनी केले आहे. 


दिव्यांग आदर्श शिक्षकांचाही होणार सन्मान 
मुस्लिम आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये दिव्यांगामधून आदर्श शिक्षक म्हणून विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी सुद्धा पात्र दिव्यांग आदर्श शिक्षकांनी नोंद करून आपल्या कार्याची आणि परिचयाची संपूर्ण माहिती वरील पत्त्यावर आणि व्हाट्सअप नंबर वर पाठवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !