संप तात्पुरता स्थगित कर्मचारी संघटना संपावर ठाम - बाबा बडे, बळीराम उबाळे


बीड प्रतिनिधी :- बीड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा बडे जि प कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे तलाठी संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर राख उपाध्यक्ष एस पी जगताप कळसकर सर निमंत्रक राजकुमार कदम सचिव हरिश्चंद्र ठोसर अध्यक्ष शीलाताई मुंडे प्रवक्ते डीजी तांदळे सर सचिव नंदकिशोर परळकर कार्याध्यक्ष संभाजी जाधव यांनी दिनांक 26/08/2024 तहसील कार्यालय माजलगाव धारूर वडवणी व दिनांक 27/08/2024 रोजी पंचायत समिती अंबाजोगाई परळी केज वैद्यकीय महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ येथील प्रत्येक कार्याला जाऊन जुनी पेन्शन व राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना व इतर मागण्यासाठी 29/08/2024 च्या बेमुदत संपाबाबत प्रत्येक तालुका अध्यक्ष सचिव सर्वप्रमुखांच्या भावना जाणून घेतल्या व स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज परिचर संघटनाशी प्रत्यक्ष भेट घेऊन संपा बाबत सर्वांना मार्गदर्शन केले प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मिळण्याबाबत च्या भावना अतिशय तीव्र होत्या प्रत्येकाने सांगितलं की पेन्शनचा आदेश मिळाल्याशिवाय संप मागे घेऊ नका कारण सरकार पेन्शन बाबत सतत चालढकल करीत आहे त्यामुळे राज्य मध्यवर्ती संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने प्रत्येक कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या पेन्शन विषयी भावना जाणून घेतले आहेत प्रत्येक कर्मचारी पेन्शन मिळवण्यासाठी बेमुदत संपावर जाण्यास ठाम असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. परंतु महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर साहेब यांनी दिनांक 27/08/2024 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी प्रलंबित मागण्या बाबत सविस्तर चर्चा झाली राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारित निवृत्ती वेतन योजना राबवली जाईल असे अभिवचन देऊन इतर मागण्याबाबत निर्णायक चर्चा सध्या व्यवस्थित माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे दोन/तीन दिवसानंतर सर्व चित्र संपन्न होईल असे स्पष्ट केले समन्वय समितीच्या विस्तारित सभेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्यानुसार अपेक्षित निर्णय घेण्यासाठी काही दिवसाचा कालावधी देणे योग्य होईल असा ठराव मंजूर करण्यात आला त्यामुळे दिनांक 29 ऑगस्टच्या नियोजित संपाची बदललेली पुढील तारीख 4 सप्टेंबर रोजी समन्वय समितीच्या विस्तारित सभा पुन्हा घेऊन ठरविण्यात येईल. असे समन्वय समितीने कळविले आहे मित्रहो निश्चित सर्व प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे यानंतरही काही दगा फटका झाल्यानंतर सर्व कर्मचारी संघटना मोठे बेमुदत आंदोलन उभा करतील असा इशारा सर्व कर्मचारी संघटनाने दिला आहे असे महासंघाच्या प्रसिद्धीपत्रका द्वारे शिवलाल राठोड युसुफ पठाण प्रदीप बनकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !