ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत वर बिराड मोर्चा

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत वर बिराड मोर्चा :- नितीन सोनवणे 

100 रमाई घरकुलाचे प्रलंबित पहिला हप्ता तात्काळ द्या.

दोन महिन्यांपासून यादी लागलेली असून मंजूर झालेल्या शंभर रमाई घरकुलाचे पाटोदा येथील चेक देण्यात यावेत भर पावसात दलितांचे घरे उघड्यावर आहेत चेकला उशीर झाला म्हणून दलित समाजात संताप आहे मानसिक तणावात आहेत आजही स्वतंत्र भारतात आमची व्यवस्था बिकट आहे मंजूर चेक वाटप न करणे हा जातीवाद आहे ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे येणाऱ्या चार दिवसात चेक वाटप न झाल्यास शिवाजी चौक ते नगर पंचायत पाटोदा दलितांचा बिराड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार करतील राज्याचा मुद्दा केल्याशिवाय शांत बसणार नाही उघड्यावर कुटुंब राहत आहेत पावसात त्यांच्या जिवितास काही झाल्यास नगरपंचायत जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन आज मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांना ऑल इंडिया पॅंथर सेना च्या वतीने देण्यात आले, नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष, बापू जावळे तालुका अध्यक्ष, ऋषिकेश जावळे, आशिष जावळे, नितीन जावळे, सुरज जावळे, गोटू जावळे, प्रतीक जावळे, संकेत जावळे, व पाटोदा तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.!

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !