परळी ते बीड बसवाहक महिला कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत उद्धटपणा, बेशिस्त वर्तन

बसमधील प्रवाशानी प्रश्न विचारले म्हणून चालू प्रवासातील बस 20 मिनिटे थांबवून ठेवली 

 परळी प्रतिनिधी - परळी ते बीड लालपरी प्रवसात करत असताना प्रवाशासोबत घडलेला हा धक्कादायक , प्रकार आहे, पांगरी ता.परळी येथील पर्यायी नळकांडी पुल वाणनदीला आलेल्या पुरानी चार दिवसा पूर्वीच वाहून गेला आहे. महामंडळाने गेल्या चार दिवसापासून या महामार्गावर बस सेवा वळवली आहे,परंतु रोड निश्चित न केल्याने याचा नाहाक त्रास बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे.परळी ते सोनपेठ, सोनपेठ ते शिरसाळा त्यानंतर बीड थेट बीडचे तिकीट मिळत नाही. तात्काळ रूट निश्चित करून थेट परळी ते बीड जाणाऱ्या प्रवासात तिकीट देण्याची व्यवस्था करावी. यामुळे प्रवास करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त भाड्याचा त्रास करावे लागत आहे. यावर आजच आपण निर्णय घ्यावा अन्यथा आपली व आपल्या उद्धट वाहक व चालक यांची तक्रार आपल्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहे. परळी बस स्थानकाचे डेपो मॅनेजर यांना अनेक वेळा बस मधून फोन केला त्यांनी तो फोन उचलला नाही. परळी ते बीड बस मध्ये प्रवास करत करताना हा सर्व प्रकार घडला . सदरील परळी डेपो ची बसचा क्रमांक MH-20 BL-1882 
 या बसचे चालक व वाहक यांच्यावर कारवाई करण्यात यावी थेट तिकिटाची मागणी केल्यानंतर, व्यवस्थित बोलण्याऐवजी आपण वरिष्ठांशी बोला, व हुज्जत घालत बस मध्येच रस्त्यावर 15 ते 20 मिनिटं थांबवली, पाठीमागून येणारी देखील बस अधिकारी आहेत म्हणून थांबून घेतली, त्या बसमधील वाहक व चालक हे आमच्या बसमध्ये येऊन आम्हाला शांत राहण्याची सूचना करत होते. या उलट आपण परळीच्या डेपो मॅनेजर यांना बोला असे सांगण्यात आले व नंबर उपलब्ध करून दिला नाही. चर्चा अंति हा आपला नंबर देण्यात आला. बस मध्ये घडत असलेला प्रकार मी पत्रकार असल्याने सर्व मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होतो, वाहक महिला (कंडक्टरणे) पत्रकाराच्या हातातील व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असलेला मोबाईल झडप मारून हिसकाटून घेतला, तो बराच वेळ दिला नाही. या वाहक महिलेने उडवा उडवी उत्तरे दिली. सर्व बसमधील प्रवासाला वेटीस धरले. एका पत्रकाराला व्हिडिओ करण्यापासून व वार्तांकन करण्यापासून रोखले,अशा हे बेशिस्त व उद्धटपन्नाची वागणूक देणाऱ्या वाहक व चालकावर योग्य ती कारवाई करा. अन्यथा आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !