अबब ! घोळच- घोळ ; पत्रावर आवक/जावक नंबरच नाही

अबब ! घोळच- घोळ ; पत्रावर आवक/जावक नंबरच नाही

केजच्या बिडिओ तथा विस्तार अधिकाऱ्यानी सोडायला लावले आमरण उपोषण

गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांच्या तसेच उपोषणकर्त्या समोर कर्मचाऱ्यांची दादागिरी 
गट विकास अधिकारी हा पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून विविध विवरणपत्रे, हिशोब, अहवाल व त्याबाबतचे स्पष्टीकरण मागवितो. पंचायत समिती आणि राज्य शासन यामध्ये दुवा म्हणून गट विकास अधिकारी कार्य करतो. गट विकास अधिकारी पंचायत समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवतो. यासाठी वा इतर विकास कामानंसाठी गटविकास अधिकारी काम करतो मात्र केजच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने या केजचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे आठवड्यातील दोन दिवसानंसाठी अंबाजोगाईहुन येऊन केजचा कारभार पाहतात त्यामुळे म्हणावी ऐवढी वचक या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तथा अधिकाऱ्यांवर नसल्यामुळे रोजगार सेवक ते वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी आपल्या मनःमर्जीने वागत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. 
केज तालुक्यातील मौजे धनेगाव येथील मागासवर्गीय समाजातील रंजित महादेव सोनवणे, छत्रभुज पांडुरंग सोनवणे, खंडु शेषेराव सोनवणे, संजय दत्तु सोनवणे रमाई घरकुल योजनेचा तीसरा हप्ता द्यावा तसेच पैशाची मागणी करणारा रोजगार सेवक बालासाहेब अरुण शिंदे यास निलंबित करावे यासह विविध मागण्याच्या संदर्भाने केज पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात दि. ३० ऑगस्ट वार शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता आमरण उपोषणास बसले होते . सायं ५ वाजता गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने या आपल्यासोबत विस्तार अधिकारी रोडेवार आर.एच.,ग्रामसेवक डि. व्हि.बिराजदार यांच्यासह रोजगार सेवकांचा ताफा घेऊन दाखल झाल्या. सदरील ठिकाणी अगोदरच पत्रकार बांधव उपस्थित होते परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी चित्रफीत ( व्हिडीओ ) घेण्यास पत्रकारांना मज्जाव केला. आमच्या मागण्या मान्य होतं नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी नसल्याचे स्पष्ट केले. अगोदर ग्रामसेवक डि. व्हि. बिराजदार व रोजगार सेवक बालासाहेब अरुण शिंदे याच्यावर करवाई करा त्यानंतरच उपोषण सोडु असे उपोषणकर्ते म्हणताच चक्क गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांच्यासमोर ग्रामसेवक डि. व्हि. बिराजदार " काय कारवाई करायची ते करा " असा उपोषण कर्त्याला दम दिला तसेच विस्तार अधिकारी रोडेवार यांनी पत्रकारानं सोबत हुज्जत घातली मात्र यावर कोणताही प्र शब्द गटविकास अधिकारी यांनी काढला नाही. उलट उपोषणकर्त्यालाच उलट प्रश्न विचारून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातच विशेष म्हणजे उपोषण सोडण्यासाठीचे जे पत्र गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने ,विस्तार अधिकारी रोडेवार आर.एच.,ग्रामसेवक डि. व्हि. बिराजदार हे घेऊन आले होते व ज्या पत्राव्दारे उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले त्यावर आवक-जावक नंबरच नसल्यामुळे या उपोषणकर्त्याच्या मागण्यांचे काय होणार ? असा प्रश्न जनेतेच्या चर्चेचा विषय बनला आहे. जर संविधानिक पदावर बसणारे अधिकारी , कर्मचारी इतक्या बेजबाबदार प्रकारे वागत असतील व त्यामुळे जनतेला मानसीक , शारीरीक व आर्थिक त्रासाला समोरे जावे लागत असेल तर आश्या अधिकारी, कर्मऱ्यांवर कारवाई होने गरजेचे आहे. असे सर्वसामान्य जनतेमध्ये बोलले जात आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !